हसीन दिलरुबा! तापसीच्या बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, साडीत दाखवल्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 04:41 PM2024-06-12T16:41:27+5:302024-06-12T17:11:12+5:30

तापसी पन्नूचं साडीतील सौंदर्य, पाण्यात उतरत दिल्या पोज

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये तापसी पन्नू (Taapsee pannu) ही कायमच वेगळी ठरली आहे. सिनेमांची निवड, तिचा परफॉर्मन्स यामुळे तिने आपलं वेगळेपण जपलं आहे. इंडस्ट्रीतील नसूनही तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

सध्या तापसीने इन्स्टाग्रामवर उदयपूर येथील फोटोशूटचा धडाकाच लावला आहे. या फोटोशूटमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. चाहत्यांची तिच्या या फोटोंवरुन नजरच हटत नाहीए.

कपाळावर बिंदी, पिवळी साडी परिधान करत ती पाण्यात उतरली आहे. भिजलेल्या अवस्थेत ती चाहत्यांच्या हृदयाचा ठोका वाढवत आहे. तिचा हा लूक आकर्षित करत आहे.

आजुबाजूला सुंदर वातावरण त्यात तापसीने तिच्या अदांनी लक्ष वेधून घेतलं आहे. तिचं हे पाण्यातील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तापसीने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड मॅथियास बोएसोबत उदयपूरमध्येच लग्नगाठ बांधली. तापसी तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमी खाजगी ठेवते. मात्र तिने उदयपूरमध्ये लग्न केल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. हे तेव्हाचंच फोटोशूट असल्याचा अंदाज आहे.

काही दिवसांपूर्वीच तिने उदयपूरमधील आणखी काही फोटो पोस्ट केले होते. यात तिने लाल साडी परिधान केली होती. 'हसीन दिलरुबा' या तिच्याच सिनेमात तापसीचा जो लूक होता अगदी तशीच ती या लाल साडीत दिसत आहे.

यातही तापसी कमालीची फिट दिसत आहे. तिचा बोल्ड अँड ब्युटीफूल लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

तापसीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. 'लाल मिरची','तडक भडक पोज','हसीन दिलरुबा आली' अशा कमेंट्स आल्या आहेत.