तुम्हीसुद्धा जुन्या रुग्णवाहिकेलाही बनवू शकता घर, हे फोटो पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:45 PM2019-10-15T22:45:39+5:302019-10-15T22:51:32+5:30

एखाद्या रुग्णवाहिकेला घरामध्ये परावर्तित करण्याचा कोणी विचारही करू शकत नाही, परंतु एका अवलियानं हे शक्य करून दाखवलं आहे.

मायकल जेव्हा 23 वर्षांचा होता, तेव्हा त्यानं एक जुनी रुग्णवाहिका विकत घेतली.

त्यानं या रुग्णवाहिकेवर काम सुरू केलं. आता तो 28 वर्षांचा झाला असून, त्या रुग्णवाहिकेला पूर्णतः घरात रुपांतरित केलं आहे.

त्याच्याकडे घर विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, मग तो या रुग्णवाहिकेतच राहू लागला.

त्यानंतर त्यांनी घर तयार करण्याचा विचार केला, अनेकांनी या अँबुलन्समध्ये घर होणं शक्य नसल्याचं सांगितलं.

परंतु मायकलनं इच्छाशक्तीच्या जोरावर या अँबुलन्सला घर बनवलं. यासाठी तुम्हाला भाडं द्यावं लागत नाही.