IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा?

By सुशांत जाधव | Updated: May 18, 2026 17:25 IST2026-05-18T17:24:57+5:302026-05-18T17:25:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AFG Test: Jasprit Bumrah OUT; Will Team India open the door for Ranji star Auqib Nabi Dar? | IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?

IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून ३१ मे रोजी या हंगामाचा शेवट होणार आहे. त्यानंतर आठवड्याभरातच भारतीय संघ घरच्या मैदानातून अफगाणिस्तान विरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसह आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात करेल. भारत आणि अफगािस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका ६ जून ते २० जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यातील कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे रणजी स्पर्धा गाजवणारा औकिब नबी दार याला टीम इंडियात पहिली संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा?
 
सध्याच्या घडीला जी माहिती समोर येत आहे त्यानुसार, अजित आगरकर यांच्या अक्षखतेखालील BCCI ची निवड समिती या आठवड्यात संघ निवडीसाठी बैठक पार पडणार आहे. मंगळवारी संघाची घोषणा केली जाईल, असे बोलले जात आहे. 

६० विकेट्स! ७ वेळा ‘पंजा’…रणजीत चमकलेल्या Aaqib Nabi Dar ला टीम इंडियात घ्या; दादाची थेट आगरकरांकडे मागणी

जसप्रीत बुमराहाच्या खेळण्याबाबत संभ्रम, कारण...

६ जूनपासून न्यू चंदीगडमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी BCCI पूर्ण ताकदीचा संघ जाहीर करू शकते. मात्र जगातील अव्वल कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. अफगाणिस्तान विरुद्धचा कसोटी सामना हा यंदाच्या WTC चक्राचा भाग नाही. त्यामुळेच जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

रणजी स्पर्धा गाजवणाऱ्या गोलंदाजाला मिळणार संधी

अफगाणिस्तान विरुद्धचा कसोटी सामना जम्मू काश्मीरचा स्टार जलगती गोलंदाज औकिब नबी दारसाठी अविस्मरणीय ठरू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी स्पर्धा गाजवणाऱ्या या गोलंदाजाला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी मिळू शकते. जम्मू-काश्मीरला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात त्याची मोठी भूमिका होती. त्याने स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली होती.

भारताचा अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संभाव्य संघ :

केएल राहुल,यशस्वी जैस्वाल,देवदत्त पडिक्कल,शुभमन गिल (कर्णधार),ऋषभ पंत (यष्टिरक्षक),वॉशिंग्टन सुंदर,रवींद्र जडेजा,नितीश रेड्डी,कुलदीप यादव,मोहम्मद सिराज,प्रसिद्ध कृष्णा,मानव सुथार,आकाश दीप,ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक),औकिब नबी दार.

Web Title : अफगानिस्तान टेस्ट से बुमराह बाहर? रणजी स्टार औकिब नबी को मौका?

Web Summary : जसप्रीत बुमराह को अफगानिस्तान टेस्ट से বিশ্রাম दिया जा सकता है। रणजी ट्रॉफी के स्टार औकिब नबी दार को भारत के लिए पहला कॉल-अप मिल सकता है। चयनकर्ता जून के मैच के लिए टीम को अंतिम रूप देने के लिए इस सप्ताह मिलेंगे, जिसमें दार को उनके शानदार रणजी प्रदर्शन के बाद शामिल किया जा सकता है।

Web Title : Bumrah OUT for Afghanistan Test? Opportunity for Ranji star Auqib Nabi?

Web Summary : Jasprit Bumrah may be rested for the Afghanistan Test. Ranji Trophy standout Auqib Nabi Dar could receive his first India call-up. Selectors will meet this week to finalize the squad for the June match, potentially including Dar after his impressive Ranji performance.