Coronavirus: ‘वर्क फ्रॉम होम’ ठरतंय कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी; तुम्हालाही जाणवतोय का ‘हा’ त्रास?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:36 PM2020-03-23T15:36:53+5:302020-03-23T15:42:15+5:30

संपूर्ण जगभरात कोरोनाचा फैलाव झाला आहे. भारतातही कोरोनाचेही ४२५ पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारने अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिलेत. कम्यूनिटी ट्रान्समिशन थांबवण्यासाठी लोकांची गर्दी कमी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र घरातून काम करणं कर्मचाऱ्यांसाठी नव्या समस्येला तोंड देण्यासारखं झालं आहे.

घरातून काम करणाऱ्यांमध्ये मानसिक दबाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. बीबीसीने याबाबत काही कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारा रवि (नावात बदल) सांगतो की त्यांचे काम तेवढेच आहे जितकं ते ऑफिसमध्ये करतात. पण घरात काम करताना दबाव येतो. आपण घरी आराम करत नाही ना अशी भावना इतरांच्या मनात निर्माण होण्याची शंका उपस्थित होते.

रवि म्हणतो, वर्क लोड तितकाच आहे जितकं काम पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑफिसमध्ये आम्ही काम करतो पण आम्ही घरातून काम करतो ते दाखवावं लागतं. घरात विश्रांती घेत नाही, हे दाखवण्यासाठी काहीतरी करत राहावं लागतं.

रवि दिल्लीत भावासोबत एका एनजीओमध्ये असोसिएट मॅनेजर म्हणून काम करतो. रविच्या भावाने सांगितले की, एनजीओत ऑपरेशन काम पाहिले जाते त्याचा दबाव खूप असतो. सध्या खूप काम बदललं आहे. जे काम ऑफिसमध्ये करतो तेच काम घरी करताना अनेक समस्या निर्माण होतात. मनावर दडपण येते. दिलेलं काम वेळेत करण्याचा दबाव असतो. पूर्ण रूटीन बदलले आहे आम्ही काम व्यवस्थित करतोय की नाही हे कंपनीला दाखवावं लागतं.

सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सीमध्ये काम सिमरन (नावात बदल) सांगते की घरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आता कोणतीही शिफ्ट निश्चित नाही. आधी जसं की 9 ते 10 तासांच्या शिफ्ट असायच्या आता घरात पूर्ण काम केल्याशिवाय उठू शकत नाही. काम तेवढचं आहे मात्र कामाचा वेळ वाढला आहे. रात्री २ वाजेपर्यंत व्हॉट्सअपला चर्चा सुरुच असते. वर्क फ्रॉम होममुळे काम जास्त करावं अशी अपेक्षा मॅनजमेंटची असते.

मॅनेजमेंटला असं वाटते की घरातून काम करताना अन्य काही काम राहत नाही. कुठे बाहेर जाऊ शकत नाही तर त्यांच्याकडून काम करुन घ्यावं. फिजिकल एक्टिविटी देखील खूप कमी आहे. आधी ऑफिसमधून निघताना काम संपलेले असते. पण आता कामाची वेळ नाही. घरात काम करत असल्याने दबाव खूप वाढला आहे.

एका खासगी कंपनीत काम करणारी सना (नावात बदल) असे म्हणते, काल रात्री मी १२ वाजेपर्यंत कामात अडकली होती. आज माझी मिटिंग असल्याने आजचं कामही मला काल करावं लागलं. ऑफिसमध्ये बसून काम करणं सोप्प जातं. काही अडचणी आल्या तर तातडीने सोडवू शकतो. थोडक्यात सांगायचं तर फोनवर काम करावं लागतं. त्यामुळे कम्यूनिकेशन गॅप वाढत कामाचा व्याप वाढतो.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका असल्याने बाजारपेठ आणि सिनेमाघर बंद करण्यात आले आहेत. लोक घरांतून बाहेर पडण्यासही घाबरत आहेत. ज्या लोकांना घरातून काम सांगितले आहे ते अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे ते घराच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि कामामुळे घरात ब्रेक घेऊ शकत नाही.

घरातून काम करत असल्याने कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी संवाद कमी झाला आहे. नेमकं कसं काम करावं याचा गोंधळ कर्मचाऱ्यांमध्ये उडतो. स्थिती सर्वसामान्य कधी होतेय याचीच वाट कर्मचारी पाहत आहे.

कंपनीच्या वेळात बॉसशी बोलून कामातील अडचणी दूर करु शकतो पण घरातून काम करताना हे कठीण होतं. वारंवार फोनवरुन समस्या सांगणे अडचणीचं जातं.

सायकोलॉजिस्ट डॉ नीतू राणा सांगतात की, घरातून काम केल्याने आपला दिनक्रम बदलतो. त्याचा परिणाम शारीरीक आणि मानसिक होतो. बेडरूममध्ये किंवा डाइनिंग टेबलवर बसून काम करण्याऐवजी घराच्या कोपऱ्यात ऑफिसचं काम करा. जेव्हा ब्रेक घायचा तेव्हा आपल्या घराबाहेर किंवा सोसायटीत राऊंड मारुन या.

ऑफिसमध्ये काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊ शकतो पण घरात काम करताना असं करता येत नाही. लोकांना याची सवय नसल्याने त्याचा त्रास जास्त होतो असं त्यांनी सांगितले.