चांगल्या CIBIL Score मुळे Loan मिळणं होणार सोपं; केवळ 'या' सहा गोष्टींकडे ठेवा लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:01 AM2021-10-12T09:01:21+5:302021-10-12T09:12:29+5:30

How to improve your CIBIL/ Credit Score : अनेकदा ग्राहकांचा CIBIL स्कोअर कमी असल्यामुळे कर्ज नाकारलं जातं. जाणून घेऊया काही टीप्स ज्याच्या मदतीनं तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर चांगला करता येईल.

How to improve your CIBIL/ Credit Score : कोणतंही लोन घेताना सर्वात महत्त्वाची बाब पाहिली जाते ती म्हणजे तुमचा CIBIL स्कोअर. होम लोन (Home Loan) असेल, व्हेईकल लोन (Vehicle Loan) असेल, पर्सनल लोन (Personal Loan) असे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं लोन असेल, सर्वप्रथन बँक CIBIL स्कोअर तपासून पाहते.

यालाच क्रेडिट स्कोअरही म्हटलं जातं. यामध्ये कोणत्याही कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या बिहेवियरची माहिती मिळते. बँक कर्जधारकाच्या क्रेडिट स्कोअरच्या माध्यमातून ती व्यक्ती वेळेत कर्ज फेडत आहे ती नाही याचीही पाहणी करते.

याशिवाय CIBIL स्कोअरच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीनं कोणत्या लोनसाठी पेमेंट डिफॉल्ट केलं आहे का किंवा कोणताही EMI भरला नाहीये का याचीही माहिती घेत असते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. म्हणूनच चांगला क्रेडिट स्कोअर असणे महत्त्वाचे आहे. पाहूया अशा काही टीप्स ज्याच्या माध्यमातून क्रेडिट स्कोअर उत्तम केला जाऊ शकतो.

तुमचे क्रेडिट कार्ड बिल असो किंवा कर्जाचा EMI, तुम्ही तुमचे कर्ज वेळेवर परत करणं महत्वाचं आहे. कोणत्याही थकबाकीच्या रकमेची परतफेड न केल्याने तुमच्या क्रेडिट रेटिंगवर परिणाम होतो. मुख्यत्वे तुम्ही तुमच्या ईएमआयची रक्कम वेळेवर भरणं आवश्यत आहे. असं न केल्यास त्यावर दंड लागू शकतो. तसंच तुमच्या क्रे़डिट स्कोअरवर परिणामही होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या ईएमआयची तारीख आणि वेळेवर रक्कम भरणं हे महत्त्वाचं आहे.

तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुम्ही एकावेळी अधिक कर्ज घेऊ नये याची खात्री करणं. दुसरं कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे पहिले कर्ज फेडले आहे याची खात्री करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत नाही. जर तुम्ही एकावेळी जास्त कर्ज घेतलं तर ते फेडण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी नाही असा कर्जदाराचा समज होऊ शकतो.

जीवनातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी बहुतेक लोकांना विविध प्रकारचे कर्ज घ्यावं लागतं. पण जेव्हा तुम्ही कर्ज घेता, तेव्हा त्यात सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड कर्ज एकत्र आहे याची खात्री करा. जेथे होम लोन (Home Loan) आणि कार लोन (Car Loan) सिक्युअर्ड लोन खाली येतात. तर, क्रेडिट कार्डावरी कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज अनसिक्युअर्ड लोन आहे. त्यामुळे संतुलन राखणं महत्त्वाचं आहे.

जेव्हा क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कर्जदारांनं दिलेल्या मर्यादेपर्यंत तुमचे क्रेडिट कार्ड न वापरणे हा एक मार्ग आहे. एका महिन्यात तुमच्या कार्डावर क्रेडिट मर्यादेच्या फक्त ३० टक्के खर्च करा. उदाहरणार्थ, जर तुमची क्रेडिट मर्यादा दरमहा २ लाख रुपये असेल तर तुमचा मासिक खर्च फक्त ६० हजार रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा.

जर तुमची क्रेडिट परतफेड चांगली असेल तर तुमची बँक तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवरील क्रेडिट मर्यादा वाढवण्यास सांगू शकते. हे क्रेडिट लिमिट तुम्ही वाढवून घेऊ शकता. याचा अर्थ तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरील खर्च वाढवा असा नाही. क्रेडिट मर्यादा जास्त ठेवा, परंतु खर्च मर्यादित करा, ज्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर सुधारेल.

तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही चुका असू शकतात ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचं पर्सनल लोन पूर्णपणे फेडलं आहे, परंतु काही एररमुळे ते अनपेड दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तपासत राहणं महत्त्वाचं आहे आणि तो एरर फ्री राहावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Read in English