Baba Vanga Predictions: सोन्या-चांदीबाबतची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली का? आर्थिक संकटानं जग हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 09:14 IST2026-02-05T08:24:38+5:302026-02-05T09:14:38+5:30
Baba Vanga Predictions: बल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवक्त्या आणि 'बाल्कनच्या नॉस्ट्रेडेमस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Baba Vanga Predictions: बल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवक्त्या आणि 'बाल्कनच्या नॉस्ट्रेडेमस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जगभरातील शक्तिशाली देश आणि प्रसिद्ध व्यक्तींबद्दल त्यांनी वर्तवलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. सध्या जागतिक आर्थिक संकटाबाबत त्यांनी केलेली भविष्यवाणी सत्यात उतरताना दिसत आहे.

बाबा वेंगा यांनी भाकीत केलं होते की, जगाला मोठ्या प्रमाणावर रोख रकमेच्या टंचाईचा सामना करावा लागेल. त्यांच्या मते, २०२६ मध्ये जगात एक मोठा 'कॅश क्रॅश' (Cash Crash) होईल, ज्यामध्ये बँकांच्या कागदी नोटांना कोणतंही मूल्य उरणार नाही. अशा परिस्थितीत केवळ सोनं, चांदी आणि तांबे हेच लोकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय ठरतील.

गेल्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. MCX वर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.८० लाख रुपयांवर पोहोचला होता, तर चांदीनं प्रति किलो ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. गेल्या एका वर्षात सोन्यात ७०% आणि चांदीत १६०% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. बाबा वेंगा यांच्या सांगण्यानुसार, या तेजीमुळे या धातूंचं महत्त्व गुंतवणूकदारांसाठी प्रचंड वाढलं आहे.

सोन्या-चांदीतील तेजीनंतर ३० जानेवारी रोजी अचानक परिस्थितीत बदल झाला. सलग तीन दिवस या धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी आपलं 'व्हर्च्युअल' सोनं आणि चांदी विकण्यास सुरुवात केली, तर काही जण या घसरणीचा फायदा घेत खरेदी करत होते.

बाबा वेंगा यांनी ज्या आर्थिक संकटाचा उल्लेख केला होता, त्याची लक्षणे २०२६ च्या सुरुवातीलाच दिसू लागली आहेत. सोबतच डॉलरमध्येही घसरण झाल्यानं जगात आर्थिक संकटाची स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल डिलिव्हरीचे सोने ५ हजार रुपयांच्या वाढीसह १.५९ लाख रुपयांवर पोहोचलं असून चांदी २.८४ लाख रुपयांवर आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार होत असले तरी, लोक आता बँका किंवा एफडी (FD) ऐवजी या मौल्यवान धातूंनाच सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानत आहेत.

















