Gozero Skellig Lite: स्मार्टफोन पेक्षाही स्वस्त ई बाईक लाँच; पाहा किती आहे किंमत, काय आहे विशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:34 PM2021-07-24T15:34:00+5:302021-07-24T16:01:56+5:30

Electric Vehicle : सध्या देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक वाहनांचं प्रमाण वाढत आहे.

सध्या देशात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांचा वापर आणि त्याची क्रेझ वाढताना दिसत आहे. सध्या एक नवी ई बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आली आहे.

ब्रिटीश इलेक्ट्रीक ब्रँड GoZero Mobility नं भारतात आपली नवी ई बाईक (इलेक्ट्रीक सायकल) Skelling Lite लाँच केली आहे.

स्केलिंग लाईट हे स्वस्त आणि परवडणारं मॉडेल आहे. हे विशेष करून बिगिनर्स आणि ई-बाईक्सच्या चाहत्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. याची किंमतीही एकदम मिडरेंज स्मार्टफोन इतकी आहे.

GoZero Skelling Lite ची किंमत १९,९९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. पॉकेट फ्रेन्डली प्राईज पॉईंटसह ही ई बाईक दिसायलाही स्टायलिस्ट आहे.

स्केलिंग लाईटला अशाप्रकारे डिझाईन करण्या आलं आहे की शहरातील गर्दीच्या भागातून ती चालवण्यासह शहराच्या बाहेरील भागातही याचा वापर केला जाऊ शकेल.

ही ई बाईक अनेक ऑफलाईन आणि ऑनलाईन स्टोअर्समध्ये तसंच गो झीरोच्या वेबसाईटवरही विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्केलिंग लाईट ही ई बाईक २९९९ रूपयांत प्री बुक करू शकता.

या ई सायकलमध्ये मीडियम लेव्हलच्या रेंजसह पायडल असिस्टसोबत २५ किलोमीटरची रेंज मिळते. तसंच याचा सर्वाधिक वेग २५ किलोमीटर प्रति तास इतका आहे.

यामध्ये EnerDrive २१० वॉट लिथिअम बॅटरी पॅक आणि एक २५० वॉट रिअर हब ड्राईव्ह मोटर देण्यात आली आहे. यामध्ये एक एलईडी डिस्प्ले युनिटही देण्यात आलं आहे. तसंच यात तीन पेडल-असिस्ट मोडदेखील आहेत.

या सायकलची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी २.५ तासांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे बॅटरी संपल्यानंतर तुम्ही ही सायकल सामान्य सायकलप्रमाणेही चालवू शकता.

किंमत जरी कमी असली तरी याच्या बिल्ड क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात आलेली नाही. गेल्या काही काळापासून अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे.