शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

जगण्यायोग्य शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात सहाव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:25 IST

पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

 

देशातील जगण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईला सहावा क्रमांक मिळाला असून राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १११ शहरांचे सर्वेक्षण करून ही यादी प्रसिद्ध केली आहे. या सर्वेक्षणामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. केंद्र शासनाने २०१८ पासून देशातील जगण्यायोग्य शहरांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे व त्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात येते. नागरिकांना शहरात उपलब्ध होणाऱ्या सुविधा, राहण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण, विकासकामे या सर्वांचा आढावा या सर्वेक्षणामध्ये घेण्यात येतो. 

गुरुवारी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबईचा सहावा क्रमांक आला आहे. तर, राज्यात पुण्यानंतर दुसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीमध्ये मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीए परिसरातील महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई पहिल्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर असून मागील २९ वर्षांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबद्धपणे विकासकामे केली आहेत. यामुळे आतापर्यंत महानगरपालिकेला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. 

केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानामध्येही सातत्याने ठसा उमटविला आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. जल व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यासाठीही महानगरपालिकेने पुरस्कार मिळविले आहेत.  महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेतले असल्यामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षणाची सर्वोत्तम सुविधा शहरात उपलब्ध हाेत आहे. महानगरपालिका व खासगी रुग्णालयांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधाही चांगली असल्यामुळेच नवी मुंबईचा जगण्यायोग्य शहरांमध्ये समावेश झाला आहे. 

केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानामध्येही सातत्याने ठसा उमटविला आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. जल व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यासाठीही महानगरपालिकेने पुरस्कार मिळविले आहेत.  महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेतले असल्यामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षणाची सर्वोत्तम सुविधा शहरात उपलब्ध हाेत आहे. महानगरपालिका व खासगी रुग्णालयांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधाही चांगली असल्यामुळेच नवी मुंबईचा जगण्यायोग्य शहरांमध्ये समावेश झाला आहे. शहरात दोनशेपेक्षा जास्त उद्यानांचा समावेश nसर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण.nदेशातील सर्वात भव्य रेल्वे स्टेशनचा समावेश. nबस, रेल्वे व सार्वजनिक वाहतुकीची सर्वोत्तम सुविधा.nदेशातील  सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश.n शहरात रस्ते, पाण्यासह उत्तम नागरी सुविधा उपलब्ध 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येते. या सुविधांमुळे देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत देशात सहावा व राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याने शहराचा बहुमान वाढला आहे. नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यात स्वच्छता अभियानामध्येही सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्राधान्य देण्यात येईल.     - अभिजित बांगर, आयुक्त महानगरपालिका