शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे, अजित पवारांचे आमदार अपात्र झाले तर काय?; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर वकील सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 11:05 IST

शिवसेना-राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्यातील सत्तानाट्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. नार्वेकरांचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा आरोप आहे. त्यात सुप्रीम कोर्टात आज त्यावर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी या याचिकांच्या सुनावणीवर पहिल्यापासून लक्ष ठेवणारे वकील सिद्धार्थ शिंदेंनी विश्लेषण केले आहे.

वकील सिद्धार्थ शिंदे सांगतात की, जरी सुप्रीम कोर्टाने या आमदारांना अपात्र ठरवले तरी याचा कालावधी ११ नोव्हेंबरपर्यंतच असेल, जो या विधानसभेचा कार्यकाळ संपेल. सुप्रीम कोर्टाने आमदारांना अपात्र ठरवले तरी जास्त फरक पडणार नाही. पण आमदारांवर दबाव असेल. शिवसेनेच्या आमदारांनी ठाकरेंकडे यावे आणि राष्ट्रवादी आमदारांनी शरद पवारांकडे यावं याचा दबाव असेल. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून याचिकेवर दिशा मिळेल. सरन्यायाधीश नोव्हेंबरमध्ये निवृत्त होतायेत त्यामुळे जरी आमदारांना अपात्र ठरवले गेले तरी ते सांकेतिक असेल असंही सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलं.  दिल्लीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

तसेच आज महत्त्वाचा दिवस असून शिवसेनेच्या बाबतीत गोगावलेंनी हायकोर्टात ठाकरे गटाचे आमदार अपात्र करावेत ही याचिका चालेल की सुनील प्रभूंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय ती चालेल हे ठरणार आहे. विशेषत: शिवसेनेची याचिका सुप्रीम कोर्टात चालेल. कारण मागच्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टाने कागदपत्रे मागवली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टातच हे प्रकरण सुनावणी होईल असं वाटतं असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, राहुल नार्वेकरांनी जो निर्णय शिवसेना-राष्ट्रवादीबाबत दिला होता त्यावर आज कोर्टात सुनावणी आहे. पहिली याचिका जयंत पाटीलविरुद्ध अजित पवार आहेत. अजित पवारांच्या आमदारांना अपात्र करावं अशी जयंत पाटलांच्या याचिकेत मागणी आहे. तर दुसरी याचिका सुनील प्रभूविरुद्ध एकनाथ शिंदे अशी आहे. शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र व्हावेत असं म्हटलंय. राष्ट्रवादीची याचिका फ्रेश असल्याने यात अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना नोटिस दिली जाऊ शकते. तर शिवसेनेच्या याचिकेवर ही सुनावणी सुप्रीम कोर्टात घ्यायची की हायकोर्टात चालवायची यावर कोर्ट निर्णय देईल असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Narvekarराहुल नार्वेकर