शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

Vegetable Tomato Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत विकले जाताहेत टोमॅटो; ९३ रु. किलोवर पोहोचला भाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:33 IST

Vegetable Tomato Price Hike: पेट्रोल-डिझेल, गॅसनंतर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे.

Vegetable Tomato Price Hike: पेट्रोल-डिझेल, गॅसनंतर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोचा दर चक्क पेट्रोल आणि डिझेलच्या दराइतका झाला आहे. टोमॅटोचा दर ५० रु. ते ९३ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. 

अवकाळी पावसामुळे पीकांचं मोठं नुकसान झालं असून बाजारात भाज्या उशीरा पोहोचत असल्यानं दर वाढले आहेत. टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार कोलकातामध्ये टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ९३ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्या डिझेलचा दरही शहरात ९२ ते ९५ रुपयांच्या घरात आहे. चेन्नईत सोमवारी टोमॅटोचा दर ६० रुपये प्रतिकिलो, दिल्लीत ५९ रु. प्रतिकिलो आणि मुंबईत ५३ रुपये प्रतिकिलो इतका नोंदवला गेला. 

देशातील ५० पेक्षा अधिक शहरांमध्ये टोमॅटोचा दर वाढलाग्राहक व्यवहार मंत्रालयानं देशातील १७५ शहरांमध्ये केल्या गेलेल्या ट्रॅकिंगनुसार एकूण ५० शहरांमध्ये टोमॅटोचा दर ५० रुपये प्रतिकिलो पेक्षाही अधिक नोंदवला गेला आहे. घाऊक बाजारातही टोमॅटोचा दर खूप जास्त आहे. घाऊक बाजारात कोलकातामध्ये टोमॅटोचा दर ८४ रुपये, चेन्नईत ५२ रुपये, मुंबईत ३० रुपये आणि दिल्लीत २९.५० रुपये प्रतिकिलो इतका आहे. 

दरवाढीचं कारण काय?अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. टोमॅटोचं नवं पीक आता दोन ते तीन महिन्यांनंतर उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच टोमॅटोच्या दरात घट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चीननंतर भारत जगभरातील दुसरा सर्वाधिक टोमॅटो उत्पादक देश आहे. 

दरम्यान, राजधानी दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारापासून ते किरकोळ बाजारात भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. टोमॅटोचे दर सर्वाधिक वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणामही भाज्यांच्या दरवाढीवर पाहायला मिळतो आहे. 

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाईIndiaभारत