अग्नितांडव! राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, ७ कामगारांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:01 IST2026-02-16T12:01:27+5:302026-02-16T12:01:55+5:30
राजस्थानच्या भिवाडी येथील खुशखेडा औद्योगिक क्षेत्रात सोमवारी सकाळी एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

अग्नितांडव! राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, ७ कामगारांचा होरपळून मृत्यू
राजस्थानच्या भिवाडी येथील खुशखेडा औद्योगिक क्षेत्रात सोमवारी सकाळी एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही आग प्लॉट नंबर G1/118B मध्ये लागल्याचं सांगण्यात येत असून केमिकलच्या साठ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं. बचावकार्यादरम्यान आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे खुशखेडा औद्योगिक क्षेत्रातील केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.
भिवाडी, तिजारा आणि आसपासच्या परिसरातून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या. जवळपास दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. त्यानंतर सुरू झालेल्या बचावकार्यात ७ कामगारांचे मृतदेह हाती आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या वेळी फॅक्टरीमध्ये २० ते २५ मजूर काम करत होते. त्यापैकी काही मजूर स्वतःचा जीव वाचवून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र अनेकजण आतच अडकून पडले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.