शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटीनंतर एनटीएचा 'रिव्हेंज मोड'; NEETचा कठीण पेपर काढणार असल्याचा खान सरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 00:06 IST

NEET रद्द झाल्याने खान सर संतप्त; NTA च्या कारभारावर आणि पेपरफुटीवर ओढले ताशेरे

Khan Sir on NEET-UG 2026: नीट-यूजी २०२६  परीक्षा रद्द झाल्याने देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. मुलांच्या १० रुपयांच्या डायपरमधून गळती होत नाही, पण एनटीएचे पेपर फुटतात, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी प्रशासनावर टीका केली.

NTA नाही, ही तर Never Trustable Agency

खान सर म्हणाले की, ज्या एजन्सीवर देशाच्या भविष्याची जबाबदारी सोपवली आहे, त्यांना परीक्षा घ्यायची आहे की पेपर फोडायचे, हेच समजत नाहीये. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नाव बदलून आता नेव्हर ट्रस्टेबल एजन्सी करायला हवे," असा टोला त्यांनी लगावला. हायटेक सुरक्षेचे दावे करूनही वारंवार पेपर फुटत असल्याने त्यांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले .

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर

परीक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर खान सरांनी चिंता व्यक्त केली. ज्या विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा जास्त गुण मिळण्याची अपेक्षा होती, ते आता नैराश्यात आहेत. खान सरांनी एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगितली, ज्याच्या आईचे जानेवारीत निधन झाले होते, पण तो केवळ डॉक्टर होण्याच्या जिद्दीने अभ्यास करत होता. आता अशा विद्यार्थ्यांना आम्ही कोणत्या तोंडाने सामोरे जाणार? असा प्रश्न त्यांनी विचारला.

मुलींसमोरचे संकट

अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींसाठी ही परीक्षा म्हणजे शिक्षणाची शेवटची संधी असते. पेपर फुटीमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तपासाच्या गतीवर टीका 

सीबीआय तपासाबाबत बोलताना खान सर म्हणाले की, जर हा तपास असाच चालत राहिला, तर मुलांची एमबीबीएस पूर्ण होईल पण तपास संपणार नाही. या प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

गरीब कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले

एनटीएचे लोक कोट्यधीश आहेत, ते एसी रूममध्ये बसतात. पण रस्त्यावर हातगाडी चालवणाऱ्या बापाच्या मुलाचा विचार कोण करणार? असा सवाल खान सरांनी केला. अनेक पालकांनी कर्ज काढून मुलांच्या कोचिंग आणि प्रवासाचा खर्च उचलला आहे. आता पुन्हा १५०० किमी लांब परीक्षेला पाठवणे या कुटुंबांना परवडणारे नाही, असेही  ते म्हणाले.

खान सरांनी कोचिंग इंडस्ट्रीतील काही लोकांवरही निशाणा साधला आहे. केवळ टॉपर बनवून नफा कमवण्याचे व्यावसायिक मॉडेल काही जण राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पेपर फुटल्यानंतर जेव्हा पुन्हा परीक्षा घेतली जाते, तेव्हा एनटीए रिव्हेंज मोडमध्ये येऊन अत्यंत कठीण पेपर सेट करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण अधिकच वाढतो, असेही त्यांनी सांगितले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Paper Leak: Khan Sir Claims NTA Will Set Tougher Paper.

Web Summary : Khan Sir criticizes NTA after the NEET paper leak, highlighting student distress and financial burdens on families. He anticipates NTA will retaliate with a tougher exam, increasing student pressure. Calls for accountability and strict action.
टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकStudentविद्यार्थी