शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 12:39 IST

रेल्वे दुर्घटनेनंतर केंद्रीय मंत्री ललन सिंह यांचं मोठं विधान समोर आले असून, त्यांच्या विधानानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

तिरुवल्लूरमध्ये ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक झाली. यावेळी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली, तर १२ ते १३ डबे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेनंतर केंद्रीय मंत्री ललन सिंह यांचं मोठं विधान समोर आले असून, त्यांच्या विधानानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री ललन सिंह म्हणाले की, बिहारमध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी आम्ही माता राणीकडे प्रार्थना करतो. बिहारमध्ये गेल्या २०-२२ वर्षांपासून जशी परस्पर बंधुभावाची भावना आहे, तशीच कायम राहो. तसेच रेल्वे अपघाताबाबत ते म्हणाले की, रेल्वे अपघात तर होतच राहतात. हे अपघात जाणीवपूर्वक होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत रेल्वे मंत्रालय चौकशी करत असून लवकरच कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे. 

म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. शुक्रवारी सायंकाळी कवरपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ ही भयंकर घटना घडली. या अपघातात १९ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर, अडकलेल्या प्रवाशांना बसने पोनेरी येथे नेण्यात आले आणि नंतर दोन ईएमयू विशेष गाड्यांद्वारे चेन्नई सेंट्रलला नेण्यात आले. 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये शुक्रवारी ताशी ७५ किलोमीटर वेगाने धावणारी एक्स्प्रेस ट्रेन मेन लाईवर जाण्याऐवजी लूप लाईनमध्ये घुसली आणि उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून एका डब्याला आग लागली आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच ते बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात