शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांसोबत अदर पुनावाला यांनी साजरा केला वाढदिवस; पत्नी म्हणाली,"अजून मोठा पल्ला गाठायचाय, मग..."

By जयदीप दाभोळकर | Updated: January 15, 2021 16:35 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पुनावाला करत होते कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम

ठळक मुद्देगुरूवारी पुनावाला यांनी साजरा केला ४० वा वाढदिवसगेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस विकसित करण्याचे दिवसरात्र सुरू होते प्रयत्न

जगभरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर अनेक देशांनी त्यावर मात करण्यासाठी लस विकसित करण्याचं काम सुरू केलं होतं. भारतानंही कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम हाती घेतलं होतं. भारताला त्यात यशही मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना मंजुरी दिली. उद्यापासून या देशभरात लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवातही होणार आहे. दरम्यान, गुरूवारी सीरम इन्स्टीट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. गेल्या काही महिन्यांपासून दिवसरात्र काम करत असलेले पुनावाला यादरम्यान उत्साहित वाटत होते. तसंच त्यांनी त्यांची पत्नी नताशा, त्यांची मुलं आणि अन्य कुटुंबीयांसह आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या पत्नीनं सोशल मीडियावर या आनंदाच्या क्षणाचा एक फोटो शेअर करत आपल्या पतीसाठी खास संदेशही लिहिला आहे."या पावरहाऊसला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आणि माझे रॉक अदर पुनावाला हे या क्षणाचा आनंद घेत आहेत. हा क्षण अनेक महिन्यांच्या दिवसरात्रीच्या मेहनतीनंतर आला आहे. अजून पुढे महत्त्चाचा पल्ला गाठायचा आहे. यानंतर चांगली झोप लागेल अशी आशा करते," असा संदेश अदर पुनावाला यांच्या पत्नीनं लिहिला आहे.  अदर पुनावाला यांना अनेक दिग्गजांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरनंदेखील इन्स्टाग्राम पोस्टमधून पुनावाला यांना शुभेच्छा दिल्या. "हा मुलगा जगाला वाचवणारा आहे," असं म्हणत तिनं त्यांना शुभेच्छा दिल्या. सीरम इन्स्टीट्यूटनं विकसित केलेल्या कोविशिल्ड ही लस विकसित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या लसीकरणाच्या कामाची सुरूवात केली जाणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. टप्प्याटप्प्यानं ही लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया