शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: 'महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची; पेढ्याची ऑर्डर दिली असं समजा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 20:57 IST

तसेच तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार येणार नाही, या तीन पक्षांच्या सरकारला सत्तास्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल.

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत घडामोडी घडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची जवळपास ३ तासांहून जास्त काळ बैठक सुरु आहे. मात्र याच दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. पेढ्याची ऑर्डर दिली असं समजा अशा सूचक विधान त्यांनी केलं आहे. 

शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरु असताना संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या निवासस्थानाबाहेर राऊत मुलीसोबत फिरत असल्याचं दिसलं. रिलॅक्स मूडमध्ये राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट दूर व्हावी, या राज्यात लोकप्रिय सरकार यावं, सर्व घटनेवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लक्ष ठेवून आहेत. सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं होतं गोड बातमी देऊ पण त्यांना ती बातमी देता आली नाही, त्यामुळे महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. पेढ्याची ऑर्डर दिली आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठक सुरु असताना प्रतिक्रिया दिली.  

तसेच तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार येणार नाही, या तीन पक्षांच्या सरकारला सत्तास्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल. त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी करावी लागेल. दिल्लीत या घडामोडी घडत आहे. शरद पवारांना भेटण्यासाठी जाऊ शकतो. आघाडीच्या बैठकीत काय झालं. याची माहिती उद्धव ठाकरेंना द्यावी लागेल. ही चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाने राज्याच्या हितासाठी अशा आघाडीला पाठिंबा द्यावा अशी मान्यता सोनिया गांधी यांनी दिली आहे. सरकार स्थापन होताना प्रमुख नेत्यांशी चर्चा होते. काँग्रेस प्रमुख नेतेच या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री कोण होणार याची माहिती काँग्रेसला दिली आहे. शिवतिर्थावर शपथविधी होईल तेव्हा महाराष्ट्राला कळेल मुख्यमंत्री कोण होणार आहे. पण उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रे हातात घ्यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे असं संजय राऊतांनी सांगितले. 

ही बैठक सुरु असताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बाहेर येऊन संवाद साधला. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेल्या २१ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. ती राजवट संपविण्यासाठी दिर्घवेळ चर्चा झाली. सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार अस्तित्वात येईल. पुढील २-३ दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आणखी काही गोष्टींवर चर्चा व्हायची बाकी आहे. ती लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितले. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत पर्यायी सरकार देईल अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस