शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये भीषण अपघात; ८० प्रवाशांनी भरलेली बस ओरसा व्हॅलीत उलटली, ५ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:22 IST

घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआडांड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओरसा व्हॅलीत बस उलटून भीषण अपघात झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. मदतकार्यासाठी घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

सरकारी रुग्णालय जखमींनी भरले -
महुआडांडचे सरकारी रुग्णालय जखमींनी भरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील लोक छत्तीसगडमधील बलरामपूर येथून लोध फॉल या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र, व्हॅलीत अचानक बस उलटल्याने एकच आरडा-ओरड सुरू झाली. हा अपघात एवढा भीषण होता की प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.

५ महिलांचा जागीच मृत्यू - 
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ८० लोक बसलेले होते. आतापर्यंत पाच महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बसखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता आहे. तर काही जखमी प्रवासीही बसखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातग्रस्त बस ही बलरामपूर येथील ज्ञान गंगा हायस्कूलची स्कूल बस असल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bus Accident in Jharkhand's Orsa Valley: 5 Dead, Many Injured

Web Summary : A bus accident in Jharkhand's Orsa Valley, Lahtehar district, has killed five women and injured many. The bus, carrying around 80 people from Chhattisgarh, overturned en route to Lodh Falls. Rescue operations are underway, and the injured are being treated at a local hospital.
टॅग्स :JharkhandझारखंडAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलpassengerप्रवासी