शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 16:58 IST

करजन विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

नवी दिल्लीः राज्यसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधल्या काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. १९ जून रोजी राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, करजन विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.गांधीनगरमध्ये  गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी म्हणाले, 'मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता ते आमदार राहिलेले नाहीत. पटेल हे वडोदरामधील करंजन सीटचे आमदार असताना चौधरी यांनी वलसाडच्या कापराडा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मार्चच्या सुरुवातीला कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता आणखी दोन आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत सत्ताधारी भाजपाकडे 103 आमदार आहेत आणि विरोधी कॉंग्रेसकडे आता 66 आमदार आहेत. नुकत्याच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने तीन आणि कॉंग्रेसने दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. अभय भारद्वाज, रामलीला बडा आणि नरहरी अमीन यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे, तर कॉंग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भरतसिंह सोलंकी यांची नावे जाहीर केली आहेत.मध्य प्रदेशमधील ताकदवान नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीसुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे हे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी मार्चमध्ये काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये दाखल झाले. 19 जून रोजी राज्यसभेच्या 24 जागांसाठी मतदान होईल.

हेही वाचा

चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतले ६ मोठे निर्णय, कोलकाता बंदराला दिलं श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव 

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा