mobile company of china is breaching internal security of india | चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?

चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाला असून, अनेक देशांमधील रुग्णसंख्या वाढतीच आहे. कोरोनाच्या उत्पत्तीसाठी अमेरिकेनं वारंवार चीनला जबाबदार धरलं आहे. विशेष म्हणजे एवढे आरोप होऊनही चीन आपला आक्रमकपणा सोडण्यास तयार नाही. चीनमधल्या एका मोबाइल कंपनीनं भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मेरठमध्ये त्या मोबाइल कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

जगभरातील मोबाईल फोनच्या बाजारात चीनचा मोठा वाटा आहे. पण कोरोनाच्या संकटानं चीनचा व्यापारही मंदावला आहे, अशातच चीननं भारतात फसवे कारनामे करण्यास सुरुवात केली आहे. चीननं भारताच्या सुरक्षेशी छेडछाड केली असून, अत्यंत धोकादायक तसेच भारताच्या अंतर्गत सुरक्षा मानकांचं उल्लंघन केलं आहे. चीनची सर्वात मोठी मोबाइल कंपनी व्हिवोने एकाच आयएमईआय नंबरचे हजारो मोबाइल फोन भारतात लाँच करून विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रशासित प्रदेश आणि देशातील 28 राज्यांत एकाच आयएमईआयचे अनेक मोबाइल फोन सक्रिय असल्याचा पुरावा पोलिसांनी गोळा केला आहे. उत्तर प्रदेशात एकाच आयएमईआय नंबरवर सर्वाधिक सक्रिय मोबाइल फोन आहेत. नेटवर्किंग कंपन्या आणि मोबाईल निर्माता कंपनी असलेल्या व्हिवोला पोलिसांनी समन्स बजावले आहे. 

जगातील प्रत्येक मोबाइल फोनवर आयएमईआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख क्रमांक असतो. ही एक प्रकारची मोबाइलची ओळख असते. प्रत्येक कंपनी मोबाइलला आयएमईआय देते. चीनच्या मोबाइल कंपनीने एकाच आयएमईआय क्रमांकाचे भारतीय बाजारात 13 हजार 500 हून अधिक मोबाइल  आणले आहेत. जेव्हा एकाच आयएमईआय क्रमांकाच्या 13 हजारांहून अधिक मोबाइल फोनची सक्रिय असल्याची माहिती समोर आली, तेव्हा भारतात मेरठच्या पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. एका गंभीर प्रकरणावर मेरठमध्ये चीनची मोबाइल कंपनी विवोविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेरठ झोन पोलिसांच्या सायबर क्राइम सेलच्या तपासणीत हा मोठा खुलासा झाला आहे. मेरठच्या मेडिकल स्टेशन पोलिसांनी चीनच्या व्हिवो कंपनी आणि त्याच्या सेवा केंद्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत व्हिवो कंपनीची ही मोठी चूक मानली जाते.

मेरठच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात तैनात उपनिरीक्षक आशाराम यांच्याकडे व्हिवो कंपनीचा मोबाइल आहे. 24 सप्टेंबर 2019 रोजी स्पीकर खराब झाल्यावर त्यांनी तो मोबाइल मेरठच्या दिल्ली रोडवरील व्हिवोच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दिला. त्यानंतर तो दुरुस्त झाला. पुन्हा काही दिवसांनंतर मोबाइलमधील डिस्प्लेवर एक त्रुटी दिसू लागली. आशारामच्या मोबाइलच्या बॉक्सवर लिहिलेला आयएमईआय मोबाइलमध्ये उपस्थित आयएमईआयपेक्षा वेगळा आहे तेव्हा हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर 16 जानेवारी 2020 रोजी सर्व्हिस सेंटरच्या व्यवस्थापकाने उत्तर दिले की, आयएमईआय बदललेला नाही. यानंतर या प्रकरणाच्या तक्रारीवरून तत्कालीन एडीजी प्रशांत कुमार यांनी मेरठ झोन पोलिसांचे प्रभारी प्रबलकुमार पंकज आणि सायबर तज्ज्ञ विजय कुमार यांच्या चौकशीचे निर्देश दिले. 

हेही वाचा

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतले ६ मोठे निर्णय, कोलकाता बंदराला दिलं श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव 

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

Web Title: mobile company of china is breaching internal security of india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.