राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 21:38 IST2024-11-03T21:37:29+5:302024-11-03T21:38:43+5:30

Giriraj Singh Attacks Congress: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Giriraj Singh Attacks Congress: Rahul Gandhi wants civil war in the country, that's why he..; Serious accusation of Giriraj Singh | राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप

राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप

Giriraj Singh Attacks Congress: 'राहुल गांधींना भारतात गृहयुद्ध हवे आहे, त्यामुळेच ते नवनवीन टूल किटचा वापर करत आहेत', असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांनी केली. ते रविवारी (3 नोव्हेंबर, 2024) यूपीमधील रायबरेली येथे मीडियाशी बोलत होते.

यावेळी गिरीराज सिंह म्हणाले की, बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी भारतातही बांग्लादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे म्हटले होते. मात्र, भारतातील तरुण जागा झाला आहे, त्यामुळे काँग्रेसचे दुष्कृत्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

वक्फ बोर्ड भूमाफिया 
वक्फवर निशाणा साधत ते म्हणाले, वक्फ बोर्ड हा भूमाफिया आहे. बिहारमधील फतुहामध्ये हिंदू वर्षानुवर्षे राहत असून ही वक्फ जमीन असल्याचा दावा केला जात आहे. संसदेपासून ते संपूर्ण देशावर वक्फ बोर्डवाले आपला दावा सांगतील. काँग्रेस वक्फ बोर्डाच्या अंतर्गत गृहयुद्धाचा कट रचत आहे, अशी बोचरी टीका गिरिराज सिंह यांनी केली.

Web Title: Giriraj Singh Attacks Congress: Rahul Gandhi wants civil war in the country, that's why he..; Serious accusation of Giriraj Singh