शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 14:22 IST

Lok Sabha Election 2024: गोरखपूरचे खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी बदललेल्या वातावरणाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कन्याकुमारी येथे केलेल्या साधनेमुळे वातावरण आल्हाददायक बनले, असा दावा रवी किशन यांनी केला आहे.

आज उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाळ्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे सर्वसामान्यांच्या जीवाची काहिली होत आहे. मात्र आज बदललेल्या महिन्याबरोबरच आलेल्या पावसामुळे राज्यातील वातावरणही बदललं आहे. त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी बदललेल्या वातावरणाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथे केलेल्या साधनेमुळे वातावरण आल्हाददायक बनले, असा दावा रवी किशन यांनी केला आहे.

रवी किशन याबाबत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधनेमध्ये लीन झाले आणि हवामानात बदल होऊ लागला. मोदी साधनेत लीन होताच वातावरण आल्हाददायक बनले. जेव्हा ते साधना करतात, तेव्हा त्यांच्यासोबत पूर्ण शक्ती उभी राहते. त्यांची साधना पाहून सर्वजण पूजा पाठ करण्यात गुंतले आहेत. नरेंद्र मोदी वाट दाखवत आहेत आणि संपूर्ण देश त्यावरून मार्गाक्रमण करत आहे.  

दरम्यान, गोरखपूर येथील एका मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रवी किशन म्हणाले की, यावेळी माता-भगिनी, वृद्ध, तरुण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला साथ दिली आहे, याबाबत टक्काभरही शंका नाही, असा विश्वासही रवी किशन यांनी व्यक्त केला.  लोकसभा निवडणुकीचा सातव्या टप्प्यातील प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथे ध्यान साधना करण्यासाठी रवाना झाले होते. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे नरेंद्र मोदी ज्ञान साधना करत असून, त्यांची साधना आज संध्याकाळी समाप्त होणार आहे.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRavi Kishanरवी किशनgorakhpur-pcगोरखपुरUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४