शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 8:13 PM

एप्रिलमध्ये नेपाळ पोलिसांनी ४० कोरोना संदिग्ध लोकांना भारतात कोरोना पसरविण्यासाठी पाठविण्याच्या तयारीत असलेल्या जालिम मुखियाला अटक केली होती. यानंतर हा पाकिस्तानचा डाव उघड झाला होता.

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले आहेत. या दोन्ही दहशतवाद्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारण पाकिस्तानकडून अशाप्रकारे कोरोनाची लागण केलेले दहशतवादी भारतात घुसविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा इशारा काही महिन्यांपूर्वी देण्यात आला होता. 

एप्रिलमध्ये नेपाळ पोलिसांनी ४० कोरोना संदिग्ध लोकांना भारतात कोरोना पसरविण्यासाठी पाठविण्याच्या तयारीत असलेल्या जालिम मुखियाला अटक केली होती. यानंतर हा पाकिस्तानचा डाव उघड झाला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या जवळ दहशतवाद्यांच्या तळांवर त्यांच्या म्होरक्यांकडून भारतामध्ये कोरोना व्हायरस पसरविण्यासाठी दहशतवादी तयार केले जात आहेत. पाकिस्तानी सेनाही या कोरोना संक्रमित दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

एप्रिलमध्ये एका ऑडिओ क्लिपने खळबळ उडवून दिली होती. यामध्ये पीओकेमध्ये असलेला एक दहशतवादी त्याच्या वडिलांसोबत यावर चर्चा करत होता. त्याने म्हटले होते की, त्याचे अनेक साथीदार कोरोनाबाधित झाले आहेत. या दहशतवाद्यांना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर काश्मीरमध्ये पाठविण्याची तयारी सुरु आहे. आपल्याकडे ना ही खाण्यासाठी काही आहे नाही औषधे. केवळ शस्त्रे देण्यात आल्याचे तो दहशतवादी बोलत होता. उपाशीपोटी काश्मीरमध्ये घुसलेले दहशतवादी स्थानिकांकडून जेवण मागत आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये कोरोनाची लागण होण्याची भीती सुरक्षा दलांनी व्यक्त केली होती. यामुळे या दहशतवाद्यांना शोधून ठार मारण्याची मोहिम तीव्र केल्याचे एका अधिकाऱ्याने अमर उजालाला सांगितले. काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना जेवढ्या लवकर मारता येईल तेवढा कोरोनाचा धोका टळणार असल्याचे हा अधिकारी म्हणाला. 

बिहार होते लक्ष्यावरजालिम मुखियाने ४० तबलिगी जमातीच्या लोकांना आसरा दिला होता. रक्सौल सीमेवर भारतीय जवानांनी पाकिस्तान, इंडोनेशिया आणि भारतातील काही जमातींना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते नेपाळच्या सीमेमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते. हे लोक दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी होऊन परतत होते. नेपाळ पोलिसांनी जगन्नाथपूरचा महापौर असलेल्या मुखियाला अटक केली आहे. मुखिया हा शस्त्रांची तस्करी करतो. नेपाळ सीमेवरून त्याचा हा गोरखधंदा चालतो. तो जग्रनाथपूर गावातील रहिवासी आहे. माओवाद्यांच्या एका गटातही तो सहभागी असल्याचे सांगितले जाते. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचा सदस्यही आहे. गेल्या वेळच्या नेपाळ निवडणुकीत त्याची महत्वाची भूमिका होती. त्याचे गाव हे दोन देशांच्या सीमेवर वसलेले आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार

राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीcorona virusकोरोना वायरस बातम्या