CoronaVirus in marathi news Pune mayor's family 8 members also corona positive | पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित

पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित

पुणे : महापालिकेत पोहोचलेल्या कोरोनाने पुण्याच्या महापौरांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आज त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पुण्यात आणि महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


शहरात कोरोनाचा फैलाव झाल्यापासून मोहोळ दिवसरात्र काम करीत होते. विशेषतः वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयांशी बोलणी करून त्यांच्याशी उपचारांबाबत करारनामे करणे, शहराच्या विविध भागांतील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करणे, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणे, त्यादृष्टीने आर्थिक तरतूदीपासून सर्व वैद्यकीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोहोळ यांनी कष्ट घेतले. सातत्याने रुग्णालयांना भेटी देणे, विविध मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सामील होणे, स्वतः बैठकी घेणे अशी कामेही सुरूच होती. या काळात त्यांची पालिकेतील दैनंदिन कामेही सुरूच होती. अनेक नागरिक त्यांना भेटायला येत होते.


दरम्यान, मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकारयांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील पाहणी केली होती. या कालावधीत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली होती. परंतु ही तपासणी निगेटिव्ह आली होती. यापूर्वी त्यांना किरकोळ सर्दी, खोकला होणे असा त्रास झालेला होता. परंतु, दरवेळी टेस्ट निगेटिव्ह आली. दरम्यान, ताप आल्याने त्यांनी पुन्हा कोरोना टेस्ट करून घेतली. ही टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली. ते खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले असून लवकरच बरा होऊन पुणेकरांच्या सेवेत हजर होईन असे महापौरांनी ट्विट केले होते. 


मात्र, यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहोळ यांच्या कुटुंबियांचीही चाचणी करण्यात आली. यामध्ये मोहोळ कुटुंबापैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला आहे. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus in marathi news Pune mayor's family 8 members also corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.