SSC JHT 2020 Notification : Hindi translator jobs in Union Ministry, salary upto 1.5 lakh | मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

स्टाफ सिलेक्शन कमिशनने हिंदी भाषेत अनुवाद करण्यासाठी भरती काढली आहे. यानुसार 283 जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असून पगार डोळे दिपावणारा मिळणार आहे. 


या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 25 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या 283 पदांपैकी 275 पदे ही केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. यामध्ये ज्युनिअर ट्रान्सलेटर/ज्युनिअर हिन्दी ट्रान्सलेटर या जागा आहेत. तर 8 पदे ही सीनिअर हिंदी ट्रान्सलेटरसाठी आहेत. 


एसएससीकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी पहिला पेपर ६ ऑक्टोबर 2020 ला असणार आहे. तर या परिक्षेमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची दुसरी परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचा पेपर हा 31 जानेवारी 2021 ला होणार आहे. 
पहिल्या पेपरमध्ये हिंदी आणि इंग्रजीतील 1 मार्कचे 100-100 असे 200 प्रश्न असणार आहेत. तर दुसऱ्या पेपरमध्ये निबंध आणि पत्रलेखन असणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. 


पगार किती?
ज्युनिअर ट्रान्सलेटर आणि ट्रान्सलेटरसाठी लेव्हल 6 नुसार पगार दिला जाणार आहे. यासाठी पगार 35400 ते 112400 रुपये असणार आहे. तर सीनिअर हिंदी ट्रान्सलेटरसाठी लेव्हल 7 नुसार पगार दिला जाणार आहे. हा पगार 44900 ते 142400 रुपये असणार आहे. 
अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसींना 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर SC/ST/Women/PwD/ESM उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. 


लॉकडाऊनमध्ये मोठी सरकारी भरती
IBPS RRB Recruitment मध्ये जवळपास 43 बँकांमध्ये 9638 पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तर स्टेट बँकेनेही पुढील सहा महिन्यांत  2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जम्मू काश्मीर बँकेने 1850 जागांची भरती प्रक्रिया राबविली आहे. लॉकडाऊनमध्ये पहायला गेल्यास साडे तेरा हजार जागांवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. जम्मू कश्मीर बँकेनेही 1850 जागांसाठी भरती आयोजित केली असून या साठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे.  जम्मू कश्मीर बँकेद्वारे आलेल्या जाहिरातीमध्ये या जागांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या बँकेमध्ये बँकिंग असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसर (Bank PO) ही पदे भरली जाणार आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

मोदींचे मोठे सरप्राईज; सैन्याचा विश्वास वाढविण्यासाठी अचानक लेहला पोहोचले

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: SSC JHT 2020 Notification : Hindi translator jobs in Union Ministry, salary upto 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.