jk bank banking associate recruitment 2020: sarkari naukri on 1850 post in Jammu kashmir, ladakh | सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

सरकारी बँकांमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. लॉकडाऊनमध्ये बँकांनी मोठा दिलासा दिला असून मोठ्या प्रमाणावर भरती काढण्यात आली आहे. IBPS RRB Recruitment 2020 द्वारे 43 बँकांमध्ये 9638 पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तर स्टेट बँकेनेही पुढील सहा महिन्यांत  2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आणखी एक बँकेने 1850 जागांची भरती प्रक्रिया राबविली आहे. 


लॉकडाऊनमध्ये पहायला गेल्यास साडे तेरा हजार जागांवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. जम्मू कश्मीर बँकेनेही 1850 जागांसाठी भरती आयोजित केली असून या साठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे.  जम्मू कश्मीर बँकेद्वारे आलेल्या जाहिरातीमध्ये या जागांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या बँकेमध्ये बँकिंग असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसर (Bank PO) ही पदे भरली जाणार आहेत.


महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसारख्या शहरांमध्ये जम्मू कश्मीर बँकेच्या 18 शाखा आहेत. या बँकेची अधिकृत वेबसाईट www.jkbank.com ही असून या बँकेमध्ये 1500 बँकिंग असोसिएट आणि 350 प्रोबेशनरी ऑफिसर पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षे बँकिंग असोसिएटसाठी तर प्रोबेशनरी ऑफिसरसाठी 20 ते 32 वर्षे असावे. वयाची मोजणी 20 जून 2020 पर्यंत करण्यात येणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असायला हवी अशी अट आहे. 


पगार किती?
जेके बँकेमध्ये असोसिएटना पगार 11,765 ते 31,540 रुपये एवढा देण्यात येणार असून प्रोबेशनरी ऑफिसरसाठी 23,700  ते 42,020 रुपये देण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया 2 जुलैपासून सुरु झाली असून 23 जुलै अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. 

SBI देखील भरती करणार...
भारतीय स्टेट बँकेने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

महाराज खूश पण मंत्रिमंडळ विस्तारावरून उमा भारती 'कोपल्या'; ज्योतिरादित्यांच्या भात्यात 14 मंत्री

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: jk bank banking associate recruitment 2020: sarkari naukri on 1850 post in Jammu kashmir, ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.