ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 11:13 AM2020-07-02T11:13:27+5:302020-07-02T13:19:46+5:30

ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या कार्यालयातून काँग्रेसला आणखी एक जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहेत. या कार्यक्रमामध्ये शिंदेच्या उपस्थितीत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.

jyotiraditya scindia will give another big blow to Congress; cabinate expansion today | ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

Next

भोपाळ : राज्यसभा खासदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे पहिल्यांदाच भोपाळमध्ये येत आहेत. भोपाळ पोहोचल्यानंतर ते राजभवनामध्ये जाणार आहेत. मध्यप्रदेश सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार आहे. या शपथविधीला हजेरी लावून 12 वाजता ते राजभवनातून बाहेर पडतील व दुपारी 2.30 वाजता थेट भाजपाच्या कार्यालयात जाणार आहेत. या त्यांच्या कार्यक्रमामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. 


ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या कार्यालयातून काँग्रेसला आणखी एक जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहेत. या कार्यक्रमामध्ये शिंदेच्या उपस्थितीत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र, अद्याप या नेत्यांमध्ये कोणकोण आहे याची नावे बाहेर आलेली नाहीत.  मात्र, शिंदे यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे टेन्शन वाढविले आहे. कारण शिंदे नसतानाही अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 


मध्यप्रदेशमध्ये चार महिन्यांपूर्वी शिंदे यांनी काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडून खळबळ उडवून दिली होती. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या शिंदे यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 22 आमदार फोडले होते. यामुळे या जागांवर पोटनिवडणूक होऊ घातली आहे. यापैकी 16 जागा या शिंदे यांचे प्राबल्य असलेल्या ग्वाल्हेर, चंबळ भागातील आहेत. यामुळे या उमेदवारांना जिंकवून देण्याची जबाबदारीही शिंदे यांचीच आहे. यामुळे या भागातून काँग्रेसचे मोठे नेतेही भाजपात सहभागी होण्याची शक्यता आहे. 


शिवराजसिंहांच्या मंत्रिमंडळात ताकद वाढणार
कमलनाथ सरकारमधील 6 मंत्री हे शिंदे यांच्या गटातील होते. त्यांच्यासह अन्य 16 आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. आता शिंदे यांच्यामुळे पुन्हा सत्तेची चावी मिळालेल्या भाजपाच्या शिवराजसिंह सरकारमध्ये शिंदे यांचे 12 समर्थक मंत्री होणार आहेत. यामुळे शिंदे यांचे मध्य प्रदेश सरकारमधील वर्चस्व वाढणार असून शिवराजसिंहाना डोकेदुखीचे ठरणार आहे. शिवराजसिंहांनी बुधवारीच दिल्लीहून परतल्यानंतर महामंथनातून अमृत निघाले होते, पण विष भगवान शिव यांनी प्राशन केले होते, अशी प्रतिक्रिया दिली होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'

खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

आता नितीन गडकरी उतरले मैदानात; चिनी कंपन्यांना दणका देण्याचा जबरदस्त 'हायवे प्लॅन' तयार

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

Web Title: jyotiraditya scindia will give another big blow to Congress; cabinate expansion today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.