मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 05:09 PM2020-07-02T17:09:28+5:302020-07-02T17:21:35+5:30

चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली.

Big deal! Russia to supply 33 fighter jets to India; 12 Su-30MKIs and 21 MiG-29s includes | मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

Next

नवी दिल्ली : चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांनी एका मोठ्या संरक्षण डीलवर चर्चा केली. संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 33 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 18 हजार 148 कोटी रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले. 


या डीलनुसार भारत रशियाकडून सुखोई-30 आणि मिग-29 ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. ही एकूण 33 लढाऊ विमाने असणार असून यामध्ये 12 सुखोई-30 आणि 21 मिग-29 विमाने आहेत. याशिवाय भारताकडे असलेल्या रशियन  लढाऊ विमानांना अद्ययावत करण्यात येणार आहे. ही मिग 29 ची 59 विमाने आहेत. 


संरक्षण मंत्रालयाने 248 अतिरिक्त एअर मिसाईल खरेदी करण्याचीही परवानगी दिली आहे. ही मिसाईल भारतीय हवाई दल आणि नौदलाला वापरता येणार आहे. शिवाय DRDO द्वारे विकसित एक हजार किमी रेंजच्या क्रूज मिसाइलच्या प्रारुपालाही परवानगी देण्यात आली आहे. 

राफेलही येतेय...
याच महिन्यात फ्रान्सच्या राफेल विमानांची पहिली डिलिव्हरी दिली जाणार आहे. राफेल विमाने ही जगातील सर्वात घातक मिसाईलने आणि सेमी स्टील्थ तंत्रज्ञानाने युक्त आहेत. या लढाऊ विमानांमध्ये अत्याधुनिक मीटिअर मिसाईल ही हवेतून हवेत मारा करू शकणारी मिसाईल असणार आहे. फ्रान्सच्या बार्डोक्सहून 6 राफेल विमाने येणार आहेत. यामध्ये दोन विमाने ही प्रशिक्षणासाठी असणार आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

महाराज खूश पण मंत्रिमंडळ विस्तारावरून उमा भारती 'कोपल्या'; ज्योतिरादित्यांच्या भात्यात 14 मंत्री

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

Read in English

Web Title: Big deal! Russia to supply 33 fighter jets to India; 12 Su-30MKIs and 21 MiG-29s includes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.