OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:42 PM2020-07-03T12:42:31+5:302020-07-03T12:44:45+5:30

वनप्लसने गुरुवारी सायंकाळी तीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. OnePlus TV U1 55, OnePlus TV 4-Series 43 आणि OnePlus TV Y-Series 32 इंचाचे हे टीव्ही आहेत.

OnePlus will fight against China's Xiaomi, Realme; Launched Cheap Smart TV | OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

Next

प्रिमिअम स्मार्टफोन निर्माती कंपनी वनप्लसने मोठी चाल खेळली आहे. भारतात चायना उत्पादनांवर बहिष्काराची मोहिम सुरु असूनही तीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. महत्वाचे म्हणजे महागडी कंपनी म्हटले जाणाऱ्या या वनप्लसने केवळ 12999 रुपयांमध्ये टीव्ही लाँच केला आहे. यामुळे आता चीनच्याच Xiaomi, Realme सोबत युद्ध रंगणार आहे. 


वनप्लसने गुरुवारी सायंकाळी तीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. OnePlus TV U1 55, OnePlus TV 4-Series 43 आणि OnePlus TV Y-Series 32 इंचाचे हे टीव्ही आहेत. प्रत्येक टीव्हीची सिरिज वेगळी असली तरीही 32 इंचाच्या टीव्हीची किंमत आश्चर्यचकित करणारी आहे. OnePlus TV Y-Series 32 याची किंमत 12,999 रुपये आहे. तर 43 इंचाच्या टीव्हीची किंमत 22,999 रुपये आहे. 55 इंचाच्या टीव्हीची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 


55 इंचाच्या टीव्हीमध्ये OnePlus Cinamatic Display आहे. याचे रिझोल्युशन हे 4K आहे. यामध्ये 90% DCI P3 देण्य़ात आला आहे. तसेच कंपनीने गॅमा इंजिनही वापरले आहे. हा टीव्ही डॉल्बी व्हीजन सर्टिफाईड आहे. या टीव्हीचा स्क्रीन टू बॉडी रेशो 95 टक्के आहे. टीव्ही 6.5mm जाडीचा आहे. याचे पोर्टही दिसण्यासारखे लावण्यात आलेले नाहीत. तिन्ही टिव्हींचे डिझाईन एकसारखेच आहे. 


चांगल्य़ा आवाजासाठी कंपनीने यामध्ये 30W चे उच्च दर्जाचे स्पीकर वापरले आहेत. यामध्ये 2 फुल रेंज स्पीकर आणि 2 ट्विटर आहेत. या नव्या टीव्हींमध्ये HDR 10, HDR 10+, HLG सपोर्ट देण्यात आला आहे. गॅमा इंजिनमुळे अॅनिमेशन स्मूथ होणार आहे. तसेच नॉईसही कमी होणार आहे. रंग संगती चांगली होणार आहे. 


सॉफ्टवेअरमध्ये कोणते फिचर्स
सॉफ्टवेअरमध्ये Android TV टीव्ही बेस्ड कंपीनीचे कस्टम टीव्ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये वनप्लसचे अनेक फिचर देण्यात आले आहेत. डेटा सेव्हिंगचा पर्यायही यामध्ये आहे. दिवसा किती डेटा वापरायचा हे देखील सेट करता येणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मोदींचे मोठे सरप्राईज; सैन्याचा विश्वास वाढविण्यासाठी अचानक लेहला पोहोचले

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OnePlus will fight against China's Xiaomi, Realme; Launched Cheap Smart TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app