WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 04:15 PM2020-07-05T16:15:17+5:302020-07-05T18:20:04+5:30

डब्ल्यूएचओ जारी केलेल्या सूचनेनुसार य़ा दोन औषधांच्या वापराने कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांच्या तुलनेत मृत्यूदरामध्ये कोणतीच घट झालेली नाही. उलट मृत्यूदर वाढत चालला आहे.

WHO hits India hard again; Banned three drugs on corona virus | WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

Next

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने भारताला जोरदार धक्का दिला आहे. कोरोना रुग्णांना मलेरियावरील औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, एड्सवरील लोपिनवीर आणि रिटोनवीरचे कॉम्बिनेशनचे डोस देण्यावर पुन्हा बंदी आणली आहे. डब्ल्यूएचओने म्हटल्यानुसार या औषधांच्या वापराने मृत्यूदरामध्ये कोणतीही घट झालेली नाही.


डब्ल्यूएचओ जारी केलेल्या सूचनेनुसार य़ा दोन औषधांच्या वापराने कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांच्या तुलनेत मृत्यूदरामध्ये कोणतीच घट झालेली नाही. उलट मृत्यूदर वाढत चालला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार डब्ल्यूएचओ शनिवारी याबाबत खुलासा केला आहे. औषधांच्या चाचणीवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या शिफारशीनुसार या औषधांच्या वापरावर बंदी आणण्यात येत आहे.  गेल्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन निष्प्रभ ठरत असल्याने क्लिनिकल ट्रायलवर बंदी आणली होती. 


महत्वाचे म्हणजे जगभरात कोरोना विषाणूचा वेगानं फैलाव होत आहे. कोरोनावरील उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे या औषधासाठी अमेरिकेसह अनेक देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला होता. भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी सर्व प्रमुखांनी केली होती. यानंतर भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात सुरू केली. या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनीदेखील मोदींची स्तुती केली होती. 


काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या कोरोना रुग्णांवरील चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती. चाचणीमध्ये त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांवर हे औषध प्रभावी ठरते की नाही हे पहायचे होते. त्याआधी या औषधावर छापून आलेल्या एका लेखामुळे बंदी लादण्यात आली होती. 


चीनचा उलट दावा
दरम्यान, काही पश्चिमेकडील देशांमध्ये संशोधकांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनला कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठी बेअसर म्हटले असले तरीही चीनमध्ये काही वेगळेच समोर आले आहे. तेथील संशोधकांच्या मते या मलेरियावरील ओषधाने कोरोना व्हायरसमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यात मोठी मदत झाली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

Web Title: WHO hits India hard again; Banned three drugs on corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.