शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:54 IST

मोदी पुढे म्हणाले, “जनतेला ‘कट्टा सरकार’ नाही, तर एनडीए सरकार हवे आहे. लोकांना ‘हॅण्ड्स अप’ नाही, तर ‘स्टार्ट-अप’ हवे आहे. एनडीए सरकार शाळेची बॅग, संगणक, क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकला  प्रोत्साहन देते.”

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी बेगूसरायमध्ये मच्छीमारांची भेट घेतली होती. दरम्यान, ते जवळच्याच एका तालावावरही गेले होते. तलावावर गेल्यानंतर, त्यांनी बोटीवरून पाण्यात उडीही मारली होती. यावेळी माजी मंत्री मुकेश सहनी त्यांच्यासोबत जाळेही टाकले होते. कन्हैया कुमार आणि काही मच्छिमारही त्यांच्यासह कमरेपर्यंत गढूळ पाण्यात उतरले होते. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. आता यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राहुल गांधींना जोरदार टोला लगावला आहे.

"बिहारच्या निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस करतायेत..." -राहुल गांधींच्या या डुबकीवरून पंतप्रधान मोदींनी थेट निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, "काही 'मोठ-मोठे लोक' आता बिहारमध्ये मासे बघण्यासाठी येत आहेत. पाण्यात डुबकी मारत आहेत. बिहारच्या निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस करत आहेत." मोदी बिहारमधील सीतामढी येथे एका रॅलीला संबोधित करत होते.

'हॅण्ड्स अप' नाही, 'स्टार्ट-अप' हवे... -राहुल गांधींसोबतच पंतप्रधान मोदी यांनी आरजेडी आणि विरोधकांवरही हल्ला चढवला. मोदी म्हणाले, “जर विरोधक सत्तेत आले, तर ते लोकांना ‘कट्टा’ दाखवून घाबरवतील. बिहारला अशी कट्टा, कुशासन आणि भ्रष्टाचाराचे सरकार नको आहे. मोदी पुढे म्हणाले, “जनतेला ‘कट्टा सरकार’ नाही, तर एनडीए सरकार हवे आहे. लोकांना ‘हॅण्ड्स अप’ नाही, तर ‘स्टार्ट-अप’ हवे आहे. एनडीए सरकार शाळेची बॅग, संगणक, क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकला  प्रोत्साहन देते.”

आपल्या सभांमधून जनतेचा स्पष्ट संदेश मिळत आहे की, “बिहारला कट्टा नव्हे, तर विकास हवा आहे,” असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. दरम्यान, निवडणुकीचा दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला पार पडणार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Modi jests at Rahul Gandhi's dive, slams RJD in Bihar rally.

Web Summary : Prime Minister Modi mocked Rahul Gandhi's Bihar lake dive as election practice. He criticized RJD, advocating development over fear tactics. Modi emphasized NDA's focus on education and entrepreneurship, contrasting it with opposition's alleged 'Katta Raj'.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी