शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 10:25 AM

अ‍ॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील. या सोबतच कंपनी ५जी असलेले फोन लाँच करणार आहे. मात्र, ४जीचे फोन भारतासारख्या ४जी सेवा असलेल्या देशांमध्ये लाँच केले जाणार आहेत.

नवी दिल्ली :  भारत चीन वाद हिंसक होताच भारतात मेड ईन चायनाविरोधात लाट आली आहे. यामुळे भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून केंद्र सरकारनेही 69 चिनी अ‍ॅपवर बंदी आणली आहे. याचा फायदा आता अमेरिकी कंपन्यांनी उठविण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माती कंपनी अ‍ॅपलने पॉप्युलर फोन Apple iPhone XS Max वर मोठा डिस्काऊंट देऊ केला आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन एमआरपीपेक्षा 40000 रुपयांनी कमी किंमतीत मिळत आहे. 

अ‍ॅपलने मूळ किंमतीमध्ये 36 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे या आयफोन एक्सएस मॅक्सची किंमत घटून 69900 रुपये झाली आहे. हा फोन तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. मात्र, कमी झालेली किंमत ही केवळ गोल्ड व्हेरिअंटसाठी करण्यात आली आहे. सिल्व्हर व्हेरिअंट (64जीबी) सध्या वेबसाईटवर ऑऊट ऑफ स्टॉक दिसत आहे. तर स्पेस ग्रे कलर सध्या 68900 रुपयांना दिसत आहे. 

या फोनमध्ये 6.5 इंचाचा सुपर रेटिना OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 7 मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ कॅमेरा आहे. फोन IP68 रेटिंगचा असून 2 मीटर पाण्यामध्ये तो 30 मिनिटांपर्यंत राहू शकतो. 

स्वस्त फोन लाँच करण्याची शक्यताअ‍ॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील. या सोबतच कंपनी ५जी असलेले फोन लाँच करणार आहे. मात्र, ४जीचे फोन भारतासारख्या ४जी सेवा असलेल्या देशांमध्ये लाँच केले जाणार आहेत. या बाजारांमध्ये आयफोनच्या किंमतीही कमी केल्या जाणार आहेत. यामुळे महागडे आयफोन घेऊ न शकणारे लोकही याकडे वळतील अशी अपेक्षा कंपनीला आहे. 

वनप्लसही आणणार स्वस्त फोनवनप्लस या चीनच्या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने यंदाचे फ्लॅगशिप हँडसेट OnePlus 8  आणि OnePlus 8 Pro लाँच केले आहेत. काही दिवसांपूर्वीच 25000 च्या आतील फोन बाजारात येणार असल्याचे संकेत दिलेले असताना पुन्हा काहीतरी नवीन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने वनप्लस Z/OnePlus Nord ची घोषणा केली आहे. या फोनचे लाँचिंगही लवकरच करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपल