शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, दोन फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:42 AM

स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

अमेठी - भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर सनसनाटी विजय मिळवला. दरम्यान, या विजयाला काही तास उलटत नाहीत तोच स्मृती इराणींचे निकटवर्तीय आणि बरौलिया गावचे माजी सरपंच असलेल्या सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत तीन आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. निवडणुकीतील वादामधून सुरेंद्र सिंह यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी तातडीने अमेठीकडे धाव घेतली होती. तसेच त्यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता. सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला खांदा देतानाच स्मृती इराणी यांनी आरोपींना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढू, असे सांगितले होते. दरम्यान, सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नसीम, धर्मनाथ गुप्ता आणि बी.डी.सी रामचंद्र यांना अटक केली आहे. तसेच या तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणातील दोन आरोपी वसीम आणि गोलू हे फरार आहेत.  शनिवारी रात्री रात्री सुरेंद्र सिंह हे घराबाहेर झोपले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना लाभ मिळाला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीamethi-pcअमेठीUttar Pradeshउत्तर प्रदेश