लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे सुधारित दरडोई दोन रुपयांऐवजी पाच रुपये कर आकारला जाणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आला आहे. ...
श्रीगजानन महाराज प्रगट दिनानिमित्त येथील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थानच्या वतीने विविध धार्मिक विधी संपन्न झाले. ...
निफाड येथील निफाड- पिंपळगाव बसवंत या रहदारीच्या रस्त्यावर बुधवारी (दि.२३) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकल स्वाराला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
दिंडोरी तालुका अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दिंडोरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन धडकला. दरम्यान, मागण्या ...
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपच्या विरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२३) सायंकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. ...
तुमच्या शेतात चंदनाची लागवड करा, रोपे आम्ही पुरवितो आणि शासकीय अनुदानदेखील मिळवून देतो’ असे आमिष दाखवून तामिळनाडू राज्यातील एका नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून आठ भामट्यांच्या टोळीने जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येत सुमा ...
मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांना ‘चर्चा करायची आहे, कारमध्ये बसा’ असे सांगून संशयित राहुल जगताप याने शहराबाहेर कार नेली. दरम्यान, कारमध्ये चर्चेतून वाद उभा राहिल्याने जगतापने नानासाहेबांना जोरदार ठोशा मारला अन् ते बेशुद्ध पडले. ...
द्राक्ष हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ पूर्ण होत असला तरी अद्याप निर्यातीला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. साडेतीन महिन्यात युरोप आणि इतर देशांमध्ये ४०१०३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, अद्याप ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशी द् ...
जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रभाव आता जवळपास संपुष्टात आला असून बाधितांच्या मंगळवारी (दि.२२) नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत केवळ ३२ रुग्णांची वाढ झाली असून तर सुमारे २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा कक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. ...
जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे दुपारची बस संध्याकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकेश्वर ...