लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ...
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी दुपारी पंचवटी विभागात पाणी दौरा करत पंचवटी मनपा कार्यालय रुग्णालय तसेच शाळांना भेटी देऊन या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ...
विल्होळी येथील गौळणे लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शेतीसाठी तसेच व्यावसायिक कामासाठी झपाट्याने उपसा केला जात असल्याने त्याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने तातडीने ...
जेलरोड येथील मॉडेल कॉलनीतील डान्स क्लासहून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांन ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पंचवटी विभागामार्फत १ एप्रिल २०१८ ते १७ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ८१ कोटी ५० लाख रुपयांची वीज बिल वसुली करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने यंदा पंचवटी ...
अंबड पोलीस व युनिट गुन्हे शाखेने शनिवारी रात्रीच्या सुमारास अंबड भागातील चुंचाळे परिसरात असलेल्या घरकुल योजनेत अचानक कोम्बिंग आॅपरेशन करीत ३० टवाळखोरांसह रेकॉर्डवरील १७ गुन्हेगारांची तपासणी करताना तिघा गुन्हेगारांवरही कारवाई केली. ...
मखमलाबाद परिसरात गँगवार माजविण्याच्या इराद्याने तयारी करून प्रतिस्पर्धींना धमकाविण्यासाठी येत असल्याची कुरापत काढून चौघा संशयितांनी तिघा युवकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद बस स्टॅण्ड परिसरात घडली. ...