आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 18:53 IST2026-04-14T18:50:59+5:302026-04-14T18:53:04+5:30
Volkswagen Taigun:कारमध्ये आधुनिक 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.

आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
Volkswagen Taigun: जर्मन कार कंपनी Volkswagen ने जवळपास पाच वर्षांनंतर आपल्या लोकप्रिय SUV Taigun चे फेसलिफ्ट मॉडेल अधिकृतपणे बाजारात सादर केले आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹10.99 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने या SUV सोबत 75% पर्यंतची बायबॅक गॅरंटी देत ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे.
75% बायबॅक ऑफर...
Volkswagen च्या “Assured Buyback” योजनेअंतर्गत 3 वर्षे किंवा 30,000 किमी वापरानंतर कार परत केल्यास एक्स-शोरूम किमतीच्या 75% पर्यंत रक्कम परत मिळेल. ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे. भारतीय कार बाजारात इतक्या मोठ्या बायबॅक व्हॅल्यूची ऑफर क्वचितच पाहायला मिळते.
डिझाइनमध्ये प्रीमियम टच
नवीन Taigun मध्ये मोठे बदल नसले तरी डिझाइन अधिक आकर्षक करण्यात आले आहे. फ्रंटला स्लिम ग्रिल आणि फुल-विड्थ LED लाईट बार, इल्यूमिनेटेड Volkswagen लोगो, पियानो ब्लॅक फिनिश बंपर आणि नवीन अलॉय व्हील्स मिळतील. तर, मागील बाजूस नवीन LED टेललॅम्प्स, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, वेलकम आणि गुडबाय अॅनिमेशन मिळेल.
इंजिन आणि परफॉर्मन्स
Taigun फेसलिफ्टमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. पहिले 1.0L TSI पेट्रोल इंजिन, जे 114 bhp पॉवर, 178 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल / 8-स्पीड ऑटोमॅटिक असे दोन पर्याय मिळतील. तर, दुसरे 1.5L TSI पेट्रोल इंजिन आहे, जे 148 bhp पॉवर, 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात तुम्हाला 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिकचा पर्याय मिळेल.
केबिन आणि फीचर्समध्ये अपग्रेड
नवीन Taigun मध्ये प्रीमियम इंटीरियरसह अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात तुम्हाला 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.1-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम (AI बेस्ड फीचर्ससह), पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स...असे एकूण 40 पेक्षा अधिक फीचर्स मिळतील.
सुरक्षेतही मजबूत
सुरक्षेच्या दृष्टीने Taigun फेसलिफ्टमध्ये 6 एअरबॅग्स, ABS + EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट आणि ISOFIX माउंट्स मिळेल. कंपनीनुसार, या SUV ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग कायम ठेवण्यात आली आहे. या कारवर तुम्हाला 4 वर्षे किंवा 1 लाख किमी वॉरंटी, 4 वर्षे रोडसाइड असिस्टन्स आणि 3 फ्री सर्व्हिस मिळतील.