महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था, तुटलेले शॉवर, मोडकळीस जाळ्या यांसह अनेक समस्या सातपूर येथील तरणतलावमध्ये असून, या समस्या सोडविण्याबरोबरच प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पोहण्यासाठी येणाऱ्या महिला व नागरिकांनी केली आहे. ...
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या श्री गणरायाचे नाशिकरोड परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. ...
ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाचा गजरात सिडको, अंबड भागांतून भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. सिडको भागातून १३,३७८ गणेशमूर्ती संकलन करण्यात आले, तर २१ टन निर्माल्य जमा करण्यात आले. ...
गुलालाची उधळण करत व ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी (दि.१२) गणरायाचे विधिवत विसर्जन करून गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पांना निरोप दिला. अनंत चतुर्दशीनिमित्ताने शेकडो गणेशभक्तांनी तपोवन, गोदापार्क, रामकुंड, तसेच गंगाघाटावर गणरायाचे व ...
‘निरोप घेतो देवा, आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आलेत, तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे. त्यांना सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव,’ अशी प्रार्थना आणि गणपती बाप्पा मोरय ...
रेल्वे मंत्रालयाने मुंबई-निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ...
बाजार समितीत नोकरी लावण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेणारे सभापती शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीतील अधिकार गोठविण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयावर दाखल झालेल्या अपिलाची शुक्रवारी सुनावणी होऊन दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. साय ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास कोनशिला बसवावी व कारंजे सुरू करावे या मागणीसाठी नाशिकरोड ब्लॉक काँग्रेसतर्फे मनपाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करण्यात आली. ...
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरांसह परिसरातील अन्य देवी मंदिरांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
नाशिक शहरातील सिडको परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला, तर दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...