शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन, वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांकडून राम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ

By संकेत शुक्ला | Updated: January 12, 2024 16:36 IST

Narendra Modi: वारकरी आणि संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्व आपल्या भाषणात अधोरेखीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह भजनात सहभाग घेत त्यांच्याशी संवादही साधला.

- संकेत शुक्लनाशिक - वारकरी आणि संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्व आपल्या भाषणात अधोरेखीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह भजनात सहभाग घेत त्यांच्याशी संवादही साधला.

युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनाशिक येथे आले असता त्यांनी रामकुंडावर गोदाआरती करीत प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी काळाराम मंदिरात संतपरंपरेतील एकनाथ नामदेव तुकाराम या संतांच्या वंशजांसह राज्यातील इतर वारकरी संप्रदायातील १५ प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. एकनाथ महाराजांनी मराठीत रुपांतरीत केलेल्या भावार्थ रामायणाचा पाठ यावेळी या प्रमुखांनी केला. त्या पाठाचे संपूर्ण ग्रहण करीत त्यानंतर झालेल्या राम कृष्णाच्या जयजयकारासह भजनात मोदी तल्लीन झाले होते. 

यावेळी संप्रदायातील एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी, नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास, तुकाराम महाराजांचे वंशज पुरुषोत्तम महाराज मोरे, रामदास महाराजांचे वंशज भुषण महाराज स्वामी, प्रसाद महाराज अंमळनेरकर, महंत नामदेव शास्त्री सानप(भगवानगड), चंद्रशेखर महाराज देगलुरकर, चैतन्य महाराज देगलुरकर, महंत भास्करगिरी, महंत रामगिरी, संदिपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोर, प्रकाश महाराज जवंजाळ, संजय नाना घोंगडे उपस्थित होते. पंतप्रधान येणार म्हणून राज्यातील संतपरंपरेतील प्रमुखांना खास आमंत्रित करण्यात आले होते.  वारकरी संप्रदायाचे आशिर्वादवारकरी संप्रदायातील संतांच्या वंशजांसह इतर मान्यवरांचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आशिर्वाद घेतले. या वंशजांसह मोदींनी चर्चा करीत त्यांची केलेल्या भावार्थ पाठाचे त्यांनी ग्रहण केले. वारकरी संप्रदायातील संतांच्या परंपरेतील प्रमुखांशी संवाद झाल्याने मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केल्याची माहिती अध्यात्म आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकvarkariवारकरीkalaram templeकाळाराम मंदीर