शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

आडगावला घरफोडीत ९ तोळ्यांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 16:55 IST

नागरी वसाहत असलेल्या या परिसरात काही दिवसांपासून पोलिसांची गस्त मंदावल्याने चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे, असा आरोप नागरिकांनी करत पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देगस्त थंडावली; चोरटे सुसाटसोन्याचे दागिने तसेच ५० हजार रु पयांची रोकड, लुटल्याची घटना

नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी समर्थनगर येथे बंद घराचा कडीकोयंड्यासह कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच ५० हजार रु पयांची रोकड, असा अंदाजे साडेतीन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (दि.२४) उघडकीस आली.स्वामी समर्थनगरात भरवस्तीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून आडगाव पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी, उचलेगिरी, घरफोडीच्या घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरात पोलिसांची गस्त कमी झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घरफोडीबाबत स्वामी समर्थनगर येथील प्रभुलीला रो-हाउस क्र मांक एक येथे राहणारे संजय गोसावी यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. गोसावी दाम्पत्य शिक्षक असून, गोसावी हे कामानिमित्ताने दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी, मुलगी या दोघी घरी होत्या. शुक्र वारी (दि.२३) गोसावी यांच्या पत्नी व मुलगी नातेवाइकांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या असता रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रो-हाउसचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून नऊ तोळे वजनाचे दागिने तसेच ५० हजार रु पयांची रोकड, असा ऐवज चोरून नेला. सकाळी गोसावी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता कपाट उघडले व कपाटातील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यावरून घरात घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठत झाल्या प्रकाराबाबत माहिती देऊन घरफोडी झाल्याची तक्र ार नोंदविली. याप्रकरणी अज्ञात घरफोड्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.---गस्त थंडावली; चोरटे सुसाटआडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या उचलेगिरी वाहनचोरी तसेच घरफोडीच्या घटना वाढल्याने नागरिक भयभीत झालेले आहे. परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांना कामानिमित्त घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. नागरी वसाहत असलेल्या या परिसरात काही दिवसांपासून पोलिसांची गस्त मंदावल्याने चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे, असा आरोप नागरिकांनी करत पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी