शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

नागण प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील धायटे व विसरवाडी परिसरासाठी वरदान ठरणाºया नागन मध्यम प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील धायटे व विसरवाडी परिसरासाठी वरदान ठरणाºया नागन मध्यम प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी व सामान्य जनता सुखावली आहे.१९८२ पासून निर्माणाधीन असलेला तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्प सातत्याने चर्चेत राहिला आहे. प्रकल्पाच्या मंजुरीच्या समयी असलेला प्रकल्पाचा खर्च प्रकल्पाचे काम रखडल्याने पूर्णत्वास येईपावेतो दहा पटींनी वाढला हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. वितरीकांचे रखडलेल्या कामामुळे पुन्हा प्रकल्प चर्चेत आला होता. प्रकल्पाच्या उभारणीतील अडचणींवर मात करुन प्रकल्पात गेल्या तीन वर्षापासून पाण्याचा साठा होत असल्याने प्रकल्पाच्या लाभदायक क्षेत्रातील शेतकरी व सामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विसरवाडी व धायटे परिसरातून प्रकल्पाचे पाणी थेट नवागावपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. अनेक पाणीपुरवठा योजनांची मदार प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीच्या सिंचनासह जनावरांच्या पाण्याची भिस्तदेखील त्याच पाण्यावर आहे. तालुक्यातील धायटा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी धोक्यात आली होती. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील खोल गेल्याने चिंता वाढल्या होत्या. मे महिन्यात उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पाहता प्रशासनाने प्रकल्पातून आवर्तन सोडल्याने जनतेला हायसे झाले आहे.