शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी नांदेडमधील अख्खे गावच बसले उपोषणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:44 IST

८० वर्षांच्या म्हाताऱ्यासह महिलाही उपोषणात सहभागी 

ठळक मुद्देमहालिंगी येथे अद्यापही रस्ता नाही १९७२ ला झाला होता कच्चा रस्ता

कुरुळा (जि़ नांदेड) : कंधार तालुक्यातील मौजे महालिंगी येथील गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रस्त्यासाठी आबालवृद्धांसह तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे़ तालुक्यापासून ३५ किमीवर असलेल्या या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही़ त्यामुळे १७६० लोकसंख्येच्या या गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़  

शिक्षण, बाजार व रोजगारासाठी १० कि.मी.वर असलेल्या हाडोळती येथे जावे लागते. त्यात महालिंगी ते शेलदरा हा रस्ता खचून गेला आहे़ नाल्याच्या पाण्यात मागील एक मुलगा आणि काही जनावरे वाहून गेल्याची घटना ताजी आहे़ १९७२ ला कच्चा रस्ता झाल्याचे माजी सरपंच विश्वंभर नारायण कुटे हे सांगतात़ येणारी बसही रस्ता नसल्यामुळे बंद झाली आहे़ तर रुग्णांनाही खाटेवरुन न्यावे लागते. यामुळे सर्व गावच उपोषणाला बसले आहे़ ही आरपारची लढाई लढायची असल्याचा इशारा वृद्ध तुकाराम गोपाळ गुंठे यांनी दिला़ तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे रुक्मिणीबाई गिते, मंगलबाई भागवत गुटे, गोदावरीबाई कुठे, अनुसया पांचाळ या महिलांनी सांगितले. भाऊ गुटे, बाबूराव केंद्रे, अशोक गुट्टे, नागोराव गुट्टे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व बांधकाम विभागाला निवेदन दिले

संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळवली़ तसेच गटविकास अधिकारी कंधार यांना माहिती दिली़ लवकरात लवकर रस्ता करुन देण्यात येईल, असे  संबंधित विभागाने सांगितले. तसेच नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांना घटनास्थळी पाठवले असून मदत करू - सखाराम मांडवगडे, तहसीलदार, कंधार 

आम्ही मागील काळात खूप वेळा हा प्रश्न शासनदरबारी मांडला़ मात्र आमच्याकडे कानाडोळा झाला असून अनेक पिढ्या समस्या सहन करत जगल्या़ त्यामुळे आता आंदोलनाचा निर्णय घेतला आहे़ - विश्वंभर गुंटे, माजी सरपंच

टॅग्स :agitationआंदोलनNandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद