दम्याचा व दम्याचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे या काळात अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे नागपुरातील नामवंत श्वसनरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट दहन प्रक्रियेने केल्यास संसर्गाचे सर्व स्त्रोत जळून नष्ट होतात. परंतु कुठल्या धर्माला दहन करण्यास आपत्ती असल्यास मृतदेहाचे योग्य काळजीपूर्वक दफन करणे आवश्यक आहे. दफन करतेवेळेस खड्डा कमीत कमी सात-आठ फूट खोल असावा. ...
लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष पार्सल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून २ हजार टन पार्सलची वाहतूक केली आहे. पार्सल रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळावा यासाठी नागपूर विभागाने विविध औद्योगिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मालवाह ...
विदर्भात दरवर्षी मार्च महिन्यापासून तापणारा उन्हाळा यंदा दोन महिने विलंबाने अवतरला आहे. असे असले तरी मे महिन्याची सुरुवातच कडक उन्हाने झाली आहे. रविवारी अकोलामध्ये सर्वाधिक म्हणजे ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...
आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले. ...
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या सुचनेनंतर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊसाठी २४ कोचची श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आली. ...
मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना विषाणूशी निगडित प्रत्येकाला अहोरात्र सेवा देण्याचे कार्य करीत आहे. खऱ्या अर्थाने ते ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला ‘इंडियन एअरफोर्स’ने सलाम केला आहे. ...
विदर्भात नागपूर, अकोला, वर्धा, सेवाग्रामनंतर आता अमरावतीमध्ये कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) दिली आहे. ...
लॉकडाऊनमुळे देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली आहे. या कारणामुळे जम्मू-काश्मीरचा प्रवास न करू शकलेल्या नागपूरच्या २० प्रवाशांना बुकिंगची रक्कम वापस देण्यास विमान कंपनीने नकार दिला आहे. ...