VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल

Babar Azam Clean bowled Shaheen Afridi Kid Video: व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, भन्नाट कमेंट्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:34 IST2026-04-27T09:31:07+5:302026-04-27T09:34:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Babar Azam bowled by Shaheen Afridi 1-year-old son aliyan fans react WATCH social media viral trending | VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल

VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल

Babar Azam Clean bowled Shaheen Afridi Kid Video: पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) मधील एका मजेशीर व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला शाहीन आफ्रिदीचा अवघा एक वर्षाचा मुलगा अलियार याने चक्क 'क्लीन बोल्ड' केले. या व्हायरल व्हिडिओवर चाहते मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.

चिमुरड्याने उडवला बाबर आझमचा त्रिफळा!

पेशावर झल्मी आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील सामन्यानंतर मैदानाबाहेर हा मजेशीर प्रसंग घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये अलियार आफ्रिदीने टाकलेल्या चेंडूवर बाबर आझम खेळताना दिसत आहे, जिथे आधी एक चेंडू बाबर टोलवतो. पण पुढच्याच चेंडूवर बाबर आझम 'क्लीन बोल्ड' होतो. हे पाहून स्वतः शाहीन आफ्रिदीलाही हसू आवरत नाही.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी बाबरला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. एका चाहत्याने लिहिले, "बॉब्जीला एका लहान मुलाने आऊट केले," तर दुसऱ्याने मजेशीरपणे म्हटले, "बाबर आता लहान मुलांकडूनही बीट होतोय."

--

--

बाबरचा फॉर्म

दरम्यान, बाबर आझम सध्या पीएसएल २०२६ मध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने ९ डावात ८०.८३ च्या सरासरीने ४८५ धावा केल्या असून तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण मैदानावर मात्र शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्सने बाबरच्या पेशावर झल्मीचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयामुळे लाहोरचे बाद फेरीतील (Playoffs) आव्हान कायम राहिले आहे. पराभवानंतरही पेशावर झल्मी १० पैकी ८ सामने जिंकून १७ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे.

Web Title : शाहीन अफरीदी के बेटे ने बाबर आज़म को किया बोल्ड, फैंस ने किया ट्रोल

Web Summary : पाकिस्तान सुपर लीग में शाहीन अफरीदी के एक साल के बेटे अलियार ने बाबर आज़म को क्लीन बोल्ड कर दिया। मज़ेदार वीडियो वायरल होने पर फैंस ने बाबर को ट्रोल किया। बाबर पीएसएल में शानदार फॉर्म में हैं।

Web Title : Shaheen Afridi's son 'bowls' Babar Azam; fans troll him.

Web Summary : Babar Azam was 'clean bowled' by Shaheen Afridi's one-year-old son, Aliyar, in a playful video. Despite this, Azam is in great form in PSL 2026. He is second-highest run scorer. Lahore defeated Peshawar.