शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 07:01 IST

शरद पवार सांगतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केले आयुष्यभर, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता, असा सवाल त्यांनी पवारांना केला.

मुंबई : दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात समाचार घेतला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाही, सारखी वाघनखे काढतो, इथून अब्दाली आला, तिथून अफजलखान आला, इथून शाहिस्तेखान आला, अरे महाराष्ट्रबद्दल बोल, असा टोला त्यांनी लगावला. तर तिकडे ‘पुष्पा’चे वेगळेच चालू आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर निशाणा साधला.   

शरद पवार सांगतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केले आयुष्यभर, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता, असा सवाल त्यांनी पवारांना केला. अजित पवार इतके दिवस ओरडत होते, आता कसे गुलाबी जॅकेट घालून फिरतात? कोणी सांगितले मला माहिती नाही, पण भाजप यांना स्वीकारतो तरी कसा? असा प्रश्न करीत त्यांनी भाजपलाही लक्ष्य केले. 

पगार द्यायला पैसे नसतीललाडकी बहीण योजनेत या आणि पुढील महिन्याचे पैसे येतील, नंतर येणार नाहीत. फुकट योजनांमुळे जानेवारी-फेब्रुवारीत अशी स्थिती निर्माण होईल की या राज्य सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. त्यापेक्षा महिलांना सक्षम बनवा, त्यांच्या हाताला काम द्या. बेरोजगारांना फुकट पैसे, शेतकऱ्यांना फुकट वीज... लोकांना फुकटच्या सवयी लावायच्या आहेत. एकदा ही सवय लागली, की सर्व राजकीय पक्षांना त्याप्रमाणे वागावे लागते, अशा शब्दांत त्यांनी महायुती सरकारच्या योजनांचा समाचार घेतला.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार