शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत उद्धवसेना मोठा भाऊ, काँग्रेसला दुसरे स्थान; ३६ पैकी ३३ जागांवर एकमत; तिढा कोणत्या जागांचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:23 IST

मुंबईत महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना हाच मोठा भाऊ असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महेश पवार -

मुंबई : मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी ३३ जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामध्ये उद्धवसेनेच्या वाट्याला काँग्रेस, शरद पवार गटापेक्षा जास्त जागा येतील. ३ जागांचा तिढा २-३ दिवसांमध्ये सोडविला जाईल. महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर करण्यात येईल. मुंबईत महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना हाच मोठा भाऊ असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी युतीमधील शिवसेनेने १९ तर भाजपने १७ जागा लढविल्या होत्या. यातील फक्त मालाड मतदारसंघात भाजप उमेदवार पराभूत झाला. तर, शिवसेनेला मानखुर्द, अणुशक्ती नगर, वांद्रे - पूर्व, धारावी आणि मुंबादेवी अशा पाच ठिकाणी हार पत्करावी लागली होती. आघाडीतील काँग्रेसने २९, राष्ट्रवादी काँग्रेसने ६ आणि समाजवादी पक्षाने १ अशा जागा लढविल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला १ आणि सपाला १ जागेवर यश मिळाले होते. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने यावेळी १९ जागांवर आपला दावा सांगितला आहे. तर, गेल्यावेळी २९ जागा लढविणाऱ्या काँग्रेसने आता १४ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २ तर समाजवादी पक्षाला १ जागा देण्यात येणार आहे. मात्र, ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

संभाव्य जागा -उद्धवसेना दहिसर, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी (पूर्व), गोरेगाव, कुर्ला, कालीना, वांद्रे पूर्व, माहीम, वडाळा, वरळी, शिवडी, मुंबादेवी. 

काँग्रेस बोरिवली, मुलुंड, कांदिवली, चारकोप, मालाड (पश्चिम), अंधेरी (पश्चिम), विलेपार्ले, घाटकोपर (पूर्व), चेंबूर, वांद्रे (पश्चिम), धारावी, सायन कोळीवाडा, मलबार हिल, कुलाबा.

शरद पवार गट वर्सोवा, अणुशक्ती नगरसमाजवादी पक्ष संभाव्य जागा मानखुर्द/शिवाजीनगर 

कोणत्या जागांचा तिढा? भायखळा, चांदिवली, घाटकोपर (पश्चिम) 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार