शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 19:49 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत फोडाफोडीचे चित्र दिसून येते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत.

सोलापूर - ऐन दिवाळीत सोलापूरच्या राजकारणात राजकीय फटाके फुटत आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपाने इतर पक्षातील ५ माजी आमदारांना गळाला लावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रातोरात चर्चा करत या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे. विशेष म्हणजे या माजी आमदारात सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या महायुतीतील राष्ट्रवादीचे ३ माजी आमदार आहेत. मात्र या पक्षप्रवेशावरून स्थानिक भाजपा कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत फोडाफोडीचे चित्र दिसून येते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यातच भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांचा उद्रेक भाजपाच्या कार्यालयासमोर पाहायला मिळाला. सोलापूर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी फडणवीसांनी एका रात्रीत गेम फिरवला. बुधवारी देवेंद्र फडणवीस सोलापूरात होते. हा दौरा जिल्ह्यातील राजकारणाला निर्णायक वळण देणारा ठरला. कार्यक्रमाच्या स्टेजवरच सर्वपक्षीय नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतली. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनीही मुख्यमंत्र्‍यांशी संवाद साधला. खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही फडणवीसांना भेटले. मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही देवेंद्र फडणवीस यांना भेटले. 

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ३ माजी आमदार भाजपात?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोलापूरात पक्षातील गळती रोखण्यासाठी अजित पवार गट डॅमेल कंट्रोल करत आहे. त्यातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर दौरा करत पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अद्याप कुणीही आमचा पक्ष सोडलेला नाही. कार्यकर्त्यांचा दादांवर विश्वास आहे. जर कुणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. उद्या मीदेखील पक्ष सोडला तरीही राष्ट्रवादीची दुसरी टीम तिथे तयार असते. त्यामुळे मी गेल्याने पक्षाला मोठा फरक पडेल असं नाही. अनेक नवीन लोक पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत असं भरणे यांनी माध्यमांशी बोलताना पक्ष सोडून जाणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले. 

भाजपा कार्यकर्ते नाराज, कार्यालयाबाहेर केले आंदोलन

दरम्यान, माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांमधून विरोध सुरू झाला आहे. घोटाळ्यात अडकलेले, कलंकित नेत्यांना पक्षात घेऊ नये यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे भाजपामधील असंतोष उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या ३ आमदारांसोबत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis Poaches 3 Ex-MLA's, BJP Workers Angry in Solapur

Web Summary : Fadnavis engineered defections of 3 ex-MLAs from NCP to BJP before local elections. BJP workers protested, opposing leaders with tainted reputations. Congress leader also may join.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapurसोलापूरBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस