शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

“सुनेत्राकाकी, पार्थ-जय यांनी काळजी घ्यावी”; रोहित पवार असे का म्हणाले? कारण तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:10 IST

Rohit Pawar News: अशोक खरात प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Rohit Pawar News: महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. अशोक खरात याने राजकीय मंडळी, प्रशासनातील बड़े अधिकारी, तसेच सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमविली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, असे म्हटले आहे. 

ह्या तारखा नीट बघा. १८/१९/२० नोव्हेंबर २०२५! या दिवशी अनुक्रमे शिवरात्री, व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. भोंदू बाबा कॅ अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या? शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते. अशा थोतांडाना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणात अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की २७ जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा २८ ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदू बाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका?? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतय, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केला. यावर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. 

सुनेत्राकाकी, पार्थ-जय यांनी काळजी घ्यावी

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते. नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? २७ जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचे बेभरवशी राजकारण चांगले राहिलेले नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अशोक खरात याने आपल्या कार्यालयात अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर खरात आणि रुपाली चाकणकर यांचे काही व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये चाकणकर या खरातचे पाद्यपूजन करताना, त्याच्या पाया पडताना आणि त्याच्यावर छत्री धरताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा एका भोंदू बाबासमोर अशा प्रकारे नतमस्तक झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar warns SunetraKaki, Parth, and Jay: Here's why.

Web Summary : Rohit Pawar cautioned SunetraKaki, Parth, and Jay due to alleged black magic linked to Ashok Kharat. Allegations involve exploitation and rituals, raising concerns about political motives and potential harm within Ajit Pawar's circle. Investigation urged.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारJay Pawarजय पवारparth pawarपार्थ पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवार