शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा

By दीपक भातुसे | Updated: November 8, 2024 09:27 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील ३७ मतदारसंघांत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात सामना असून, या मतदारसंघांतील निकालाकडे विशेष लक्ष असेल.   ३८ मतदारसंघांत भाजप विरुद्ध शरद पवार गट, असा मुकाबला होणार आहे.

- दीपक भातुसे मुंबई : राज्यातील ३७ मतदारसंघांत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात सामना असून, या मतदारसंघांतील निकालाकडे विशेष लक्ष असेल.   ३८ मतदारसंघांत भाजप विरुद्ध शरद पवार गट, असा मुकाबला होणार आहे. तर, ३४ मतदारसंघांत एकेकाळचे मित्र पक्ष असलेल्या भाजप विरुद्ध उद्धवसेनेत सामना आहे. 

काँग्रेस आणि शिंदेसेनेत १९ ठिकाणी मुकाबला होणार आहे, तर शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत ९ ठिकाणी सामना आहे. अजित पवार गटाचा काँग्रेसविरोधात ७ ठिकाणी आणि उद्धवसेनेविरोधात ६ ठिकाणी सामना आहे. ७६ मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. २८८ पैकी ११ मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. यात मुंबईतील शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसेला पाठिंबा दिला आहे, तर शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये सपा, अजित पवार गट सामना असला, तरी इथे शिंदेसेनेचाही उमेदवार रिंगणात आहे.

अलिबागमध्ये मविआने शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा दिला असून, त्यांचा मुकाबला शिंदेसेनेचे महेंद्र दळवी यांच्याशी आहे, तर डहाणूमध्ये मविआने विनोद निकोले यांना पाठिंबा दिला असून, त्यांच्याविरोधात भाजपचे विनोद मेढा उभे आहेत. कळवणमध्येही माकपच्या जे. पी. गावितांना मविआने पाठिंबा दिला असून, त्यांच्याविरोधात अजित पवार गटाचे नितीन पवार रिंगणात आहेत. मावळमध्ये अजित पवार गटाच्या - सुनील शेळकेंविरोधात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे असून, त्यांना मविआने पाठिंबा दिला आहे. 

मालेगाव मध्य - एम आयएम, काँग्रेस, सपा असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, इथे महायुतीचा उमेदवार रिंगणात नाही. २०१९ च्या निवडणुकीत इथे भाजप उमेदवाराला अवघी १४५० मते पडली होती, त्यामुळे यावेळी इथे त्यांनी उमेदवारच उभा केला नाही, तर बडनेरात भाजपने रवी राणा यांना पुरस्कृत केले असून, त्यांच्याविरोधात उद्धवसेनेचे सुनील खराटे रिंगणात आहेत. 

कोणत्या पक्षाविरोधात कोणता पक्ष रिंगणात ? काँग्रेस विरुद्ध भाजप (७६) : शहादा, नंदुरबार, धुळे ग्रामीण, रावेर, भुसावळ, मुलुंड, कांदिवली (पूर्व), चारकोप, मालाड (पश्चिम), अंधेरी (पश्चिम), वांंद्रे (पश्चिम), सायन कोळीवाडा, कुलाबा,  नालासोपारा, वसई, भिवंडी (पश्चिम),  मीरा-भाईंदर,  शिवाजीनगर,  पुणेे कॅन्टोन्मेंट,  कसबा पेठ, कोल्हापूर (दक्षिण),  सांगली, पलुस-कडेगाव, जत, कराड (दक्षिण),  पंढरपूर,  अक्कलकोट,  सोलापूर शहर (मध्य),  शिर्डी,  चांदवड,  लातूर ग्रामीण,  लातूूर शहर,  निलंगा,  तुळजापूर,  औरंगाबाद (पूर्व),  फुलंब्री,  मलकापूर,  चिखली,  खामगाव,  जळगाव जामोद,  भोकर,  नायगाव,  देगलुर,  मुखेड,  राळेगाव,  यवतमाळ,  आर्णी,  उमरखेड,  धामणगाव रेल्वे,  तिवसा,  मेळघाट,  अचलपूर,  मोर्शी,  अकोट,  अकोला (पश्चिम),  देवळी,  वर्धा,  वरोरा, साकोली,  सावनेर,  उमरेड,  नागपूर (दक्षिण पश्चिम),  नागपूर (दक्षिण),  नागपूर (उत्तर),  नागपूर (पश्चिम),  नागपूर (मध्य),  कामठी,  गोंदिया,  आमगाव,  आरमोरी,  गडचिरोली,  राजुरा,  चंद्रपूर,  बल्लारपूर,  ब्रह्मपुरी,  चिमूर,   भाजप विरुद्ध शरद पवार गट (३८) : सिंदखेडा,  जामनेर,  घाटकोपर (पू),  दौंड, विक्रमगड,  मुरबाड,  उल्हासनगर,  बेलापूर,  चिंचवड,  भोसरी,  खडकवासला,  पर्वती,  इचलकरंजी,  शिराळा,  कराड (उ),  माण,  माळशिरस,  सोलापूर शहर (उ),  शेवगाव,  राहुरी,  कर्जत-जामखेड,  बागलाण,  नाशिक (पू),  आष्टी,  केज,  गंगापूर,  जिंतूर,  बदनापूर,  भोकरदन,  किनवट,  करंजा,  मूर्तिजापूर,  हिंगणघाट,  आर्वी,  काटोल,  हिंगणा,  नागपूर (पू),  तिरोडा शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट (३७) : अणुशक्ती नगर,  श्रीवर्धन,  चिपळूण,  शहापूर,  मुंब्रा-कळवा,  जुन्नर,  आंबेगाव,  शिरूर,  इंदापूर,  बारामती,  पिंपरी,  वडगाव शेरी,  हडपसर,  चंदगड,  कागल, माढा, इस्लामपूर,  तासगाव-कवठेमहांकाळ,  वाई,  फलटण,  मोहोळ, अकोले,  कोपरगाव,  पारनेर,  अहमदनगर शहर, येवला, सिन्नर,  दिंडोरी,  माजलगाव, बीड, परळी, अहमदपूर,  उदगीर, अहेरी, पुसद, तुमसर,  अहेरी भाजप विरुद्ध उद्धवसेना (३४) : धुळे शहर,  जळगाव शहर,  चाळीसगाव,  बोरिवली,  दहिसर,  गोरेगाव,  वर्सोवा,  विलेपार्ले,  घाटकोपर (पश्चिम),  कलिना (रिपाइं),  वडाळा,  मलबार हिल,  पनवेल,  उरण,  पेण,  कणकवली,  कल्याण (पूर्व),  डोंबिवली,  ठाणे,  ऐरोली,  कोथरूड,  मिरज,  सातारा,  सोलापूर (दक्षिण),  श्रीगोंदा,  नाशिक (मध्य),  नाशिक (पश्चिम),  औसा,  गंंगाखेड,  परतूर,  हिंगोली,  वणी,  वाशिम,  अकोला (पूर्व) काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना (१९) : अक्कलकुवा,  साक्री,  चांदिवली,  धारावी,  मुंबादेवी,  पुरंदर,  करवीर,  कोल्हापूर (उत्तर),  हातकणंगले,  शिरोळ,  संगमनेर,  श्रीरामपूर,  जालना,  हदगाव,  नांंदेड (उत्तर),  नांदेड (दक्षिण),  दिग्रस,  रिसोड,  भंडारा शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेना (९) : जळगाव ग्रामीण,  मुक्ताईनगर,  एरंडोल,  खानापूर,  कोरेगाव,  करमाळा,  परांडा,  घनसावंगी,  सिंदखेडराजा काँग्रेस विरुद्ध अजित पवार गट (७) : नवापूर,  अमळनेर,  भोर,  इगतपुरी,  अमरावती,  अर्जुनी मोरगाव,  पाथरी उद्धवसेना विरुद्ध अजित पवार गट (६) : वांद्रे (पूर्व),  खेड-आळंदी,  निफाड,  देवळाली,  गेवराई,  लोहा

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपा