शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस स्वबळावर की आघाडीत महापालिका लढेल? सतेज पाटील म्हणाले, “महायुतीचा पराभव होणे गरजेचे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:29 IST

Congress Satej Patil News: आता आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे हे आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

Congress Satej Patil News: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळावलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मात्र मोठी निराशा पदरी पडली. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्वच पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. ठाकरे गटाने स्वबळाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी याबाबत भाष्य केले आहे. 

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीतील बिघाडी समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या कामगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, ही आघाडी कितपत टिकेल, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली आहे. यातच काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या यादीत अनेक नावे स्पर्धेत आहेत. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार की आघाडीचा आग्रह धरणार, याबाबत सतेज पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

महायुतीचा पराभव होणे गरजेचे

जिथे शक्य असेल तिथे म्हणजे एखाद्या जिल्ह्यात आघाडी करणे शक्य असेल तर आघाडी केली पाहिजे. कारण महायुतीचा पराभव होणे गरजेचे आहे. महायुतीच्या पराभवासाठी आम्ही काँग्रेस म्हणून जी पावले उचलली पाहिजे ती उचलली जातील. मग जिथे शक्य होईल तिथे आम्ही एकत्रितपणे लढायला उतरणार आहोत. मात्र, पक्ष म्हणून आम्ही आगामी महापालिकेच्या निवडणुका ताकदीने लढणार आहोत, असे सतेज पाटील म्हणाले.

दरम्यान, आता आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे हे आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत आम्ही ताकदीने कसे लढता येईल? हे महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही आघाडी करणार आहोत, तसेच ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस म्हणून ताकदीने निवडणुका लढवू. कारण आमची लढाई ही महायुतीशी आहे. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत एकत्रित लढणे अपेक्षित आहे. तसेच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे किंवा नाही? यावर मी बोलणे संयुक्तिक ठरणार नाही, असे सतेज पाटील यांनी सांगितले. ते साम टीव्हीशी बोलत होते. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस