शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:34 IST

Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: या आधी नाशिकमध्येही बॅगा उतरल्याच होत्या, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: मालवण स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील संघर्ष वाढत चाललेला पाहायला मिळत आहे. सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या भरारी पथकाला छापेमारी करताना भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये दीड लाखाची रक्कम सापडली. याप्रकरणी आमदार निलेश राणे यांनी रात्रीत पोलीस ठाणे गाठत भाजप पदाधिकाऱ्यांवर आणि यंत्रणांवर गंभीर आरोप केले. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत थेट सवाल केला आहे. 

आमदार निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून लाखांची रोकड पकडल्याने राजकीय रणकंदन माजले. यावरून आरोप-प्रत्यारोपही झाले. सोमवारी रात्री प्रचार संपल्यानंतर मालवण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत रात्री देवगड येथील एका कारमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडली. माहिती मिळताच आक्रमक बनलेल्या आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह मालवण पोलीस ठाणे गाठले. मतदानापूर्वी मध्यरात्री घडलेल्या या हायहोल्टेज ड्रामामुळे राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले आहे. 

शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?

संजय राऊत यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण दौऱ्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. हेलिकॉप्टमधून उतरलेल्या एकनाथ शिंदे यांचे निलेश राणे स्वागत करत आहेत. यातच या व्हिडिओत एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही बॅगा असल्याचे दिसत आहे. यावरून संजय राऊतांनी विचारणा केली आहे. शिंदे मालवणात आले. येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिकमध्येही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र!, असे संजय राऊत यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, एकीकडे निलेश राणेंनी भाजपावर मतदारांना पैसे  वाटल्याचे आरोप केले. परंतु निलेश राणे आणि शिंदे-शिवसेना धुतल्या तांदळासारखी नाही. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे-शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Malvan Visit: Raut Questions Bag's Contents Amid Election Tensions.

Web Summary : Sanjay Raut questions what Eknath Shinde brought to Malvan during local elections, sharing a video of Shinde arriving with bags. This follows allegations of cash seizures linked to BJP officials, intensifying political conflict.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNilesh Raneनिलेश राणे Politicsराजकारण