शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 2:13 PM

भाजपकडून केले जात असणारे दावे फेटाळत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्याने केला आहे.

ठळक मुद्देभाजपच्या ऑपरेशन लोटसची पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चातोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाहीमहाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल - मुश्रीफ

मुंबई: पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांचा विजय झाल्यानंतर राज्यात आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर राज्यात सुरू असताना राजकारण तापतानाही दिसत आहे. मात्र, भाजपकडून केले जात असणारे दावे फेटाळत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्याने केला आहे. (ncp hasan mushrif claims that maha vikas aghadi govt continue next 25 years)

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, असे वक्तव्य केले होते. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या त्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. 

“गैरमार्गाने केलेल्या कामाचा हेतू कधी शुद्ध राहत नाही”; न्यायालयाने सुजय विखेंना सुनावले

तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाही

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचे हे सरकार पुढील २५ वर्ष चालेल, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. 

लसींवरून राजकारण! मोदी सरकार की अदार पुनावाला, नेमकं खरं कोण?

‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेला जोर 

भाजपने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे भाजप राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस सांगत असतील, तोपर्यंत त्यामध्ये तथ्य असेलच, असे सूचक वक्तव्य यावेळी केले होते. 

निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू

दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. रणनीती आखण्यात महाविकास आघाडी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती, तर काम सोपे झाले असते. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Hasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021Politicsराजकारण