West Bengal Election 2021: निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:03 PM2021-05-03T21:03:40+5:302021-05-03T21:06:47+5:30

West Bengal Election 2021: निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचे दिसून येत आहे.

west bengal election 2021 violent clash between bjp and tmc workers 9 dead | West Bengal Election 2021: निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू

West Bengal Election 2021: निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देबंगालमध्ये पुन्हा हिंसाचारतृणमूल काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडलेगेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

कोलकाता: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. देशभरातून ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या जात असून, भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत गेल्या २४ तासांत जवळपास ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. (west bengal election 2021 violent clash between bjp and tmc workers 9 dead)

पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यपालांना निवदेनही सादर केले. पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजप कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे. 

भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जातेय

भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत ममता दीदींचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या घरांचे नुकसान करत आहेत. नंदीग्राम येथेही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून, कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला, असा दावा केला आहे.  

ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; तृणमूलच्या बैठकीत निर्णय

राज्यात भीतीचे वातावरण

विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात २४ तासांत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. बंगालमध्ये भीतीचे वातावरण आहे. सत्ताधारी पक्ष हातावर हात ठेवून बसला आहे. पोलीस निष्क्रीय आहेत. आम्ही राज्यपालांना निवेदन दिले असून, त्यांनी निवेदनाचा स्वीकार केला आणि आश्वासन दिल्याची माहिती घोष यांनी दिली. 

मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, ६ मे रोजी सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले. शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही, राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
 

Web Title: west bengal election 2021 violent clash between bjp and tmc workers 9 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.